कळंबमध्ये रात्रगस्ती दरम्यान संशयीताकडून अवैध पिस्टल जप्त

 
Osmanabad police

कळंब : कळंब पोलीस ठाण्याचे पथक दि. 06.12.2021 रोजी 01.00 वा. रात्रगस्तीस होते. यावेळी कळंब येथील विश्वजित हॉटेलसमोरील रस्त्यावर त्यांनी एका व्यक्तीस संशयावरुन हटकले. यावर तो पोलीसांना टाळू लागल्याने पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ चार जिवंत काडतुसासह मॅगझीन लावलेले एक पिस्टल आढळले. त्या पिस्टलाच्या परवान्याविषयी तो पोलीसांना काहीही माहिती देउ न शकल्याने ते पिस्टल अवैध असल्याची पोलीसांची खात्री झाली. यावर पोलीसांनी त्यास अटक करुन पिस्टलसह त्याची विनानोंदणी क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल, भ्रमणध्वनी जप्त केला असून पोकॉ- विक्रम पतंगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद  : सांजा, ता. उस्मानाबाद येथील सुर्यवंशी कुटूंबातील अनिल, हनुमंत, संकेत, संभाजी, राजेंद्र या सर्वांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 05.12.2021 रोजी 12.30 वा. सु. शहरातील भवानी चौक येथे उस्मानाबाद येथील अजय अशोक सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच लोखंडी गज, पट्ट्याने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या मारहानीत हनुमंत यांनी अजय यांच्या गळ्यातील सुवर्ण साखळी काढून घेतली. अशा मजकुराच्या अजय सुर्यवंशी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 327, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : काटेवाडी, ता. उमरगा येथील भोसले कुटूंबातील सचिन, विवेक, दिनकर, व्यंकट, किरण या सर्वांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून दि. 04.12.2021 रोजी 19.30 वा. सु. ग्रामस्थ- गणेश तानाजी पाटील यांना गावातील एका दुकानासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तलवार, हंटरने मारहानकरुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web