उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुक, 2 गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद: मुरुम ते बेरडवाडी रस्त्यावर दि. 11.12.2021 रोजी 09.30 वा. मुरुम पोलीस गस्त करत होते. यावेळी मुरुम ग्रामस्थ- अल्लाउद्दीन शहाबुद्दीन कुरेशी हे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 8356 वरुन महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ असा 13,980 ₹ किंमतीचा अन्नपदार्थ वाहून नेत असतांना आढळले. यावरुन मुरुम पो.ठा. च्या पोलीस अंमलदार- अमर जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पथक दि. 11.12.2021 रोजी 02.00 वा. सु. रात्रगस्तीस होते. यावेळी उस्मानाबाद ते बार्शी रस्त्यावरील कुरणेनगर येथे कारी, ता. बार्शी येथील मन्सुर मुबारक शेख व तोहीद लालसाब ढलायत हे दोघे मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीएफ 3646 वरुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा 60,000 ₹ किंमतीचा अन्नपदार्थ वाहुन नेत असताना आढळले. यावरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोहेकॉ- जयप्रकाश गलांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


जुगार विरोधी कारवाई

लोहारा  : माकणी, ता. लोहारा येथील रजनिकांत जोगदंड व विक्रम राजपुत हे दोघे दि. 10.12.2021 रोजी 19.30 वा. सु. गावातील करजगाव रस्त्यालगत मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,715 ₹ रक्कम बाळगलेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : आलुर, ता. उमरगा येथील प्रेमनाथ राठोड हे दि. 11.12.2021 रोजी 17.00 वा. सु. गाव शिवारात 9 लि. हातभट्टी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. तर फुलवाडी तांडा, ता. तुळजापूर येथील बापुलाल जाधव हे 20.15 वा. सु. राहत्या तांड्यावर 5 लि. हातभट्टी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web