उमरगा तालुक्यात हुंडाबळी 

सासरच्या मंडळींनी माहेराहून सुवर्ण दागिने, पैसे आणण्याचा तगादा लावल्यामुळे विवाहितेची आत्महत्या 
 
Osmanabad police

उमरगा : एकोंडी येथे एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळींनी माहेराहून सुवर्ण दागिने, पैसे आणण्याचा तगादा लावल्यामुळे आपल्या राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली. 

महानंदा शाहुराज ढोले, वय 28 वर्षे, रा. एकोंडी (ज.), ता. उमरगा यांनी दि. 15.09.2021 रोजी आपल्या घरात स्वत:स पेटवून घेउन आत्महत्या केली. महानंदा  यांनी माहेराहून सुवर्ण दागिने, पैसे आणण्याचा तगादा शाहुराज ढोले (पती), शांताबाई (सासु), ईश्वर (दीर), अर्चना  (जाऊ) व नणंद  अशा सहा जणांनी लावून वेळोवेळी त्यांचा शारिरीक- मानसिक छळ केला. या छळास कंटाळून महानंदा यांनी आत्महत्या केली आहे. 

अशा मजकुराच्या महानंदा यांचे पिता- मधुकर बिराजदार, रा. होळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 498 (अ), 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


जुगार विरोधी कारवाई

उमरगा  : जुगार चालू असल्याच्या माहितीवरुन उमरगा पोलीसांनी दि. 15 सप्टेंबर रोजी 01.30 वा. सु. रामपुर शिवारात छापा मारला. यावेळी येळी ग्रामस्थ- 1)महेश माळी 2)रविराज भोसले 3)रंगनाथ कोळी 4)पवन स्वामी 5)गोविंद भोसले 6)सुरज पांढरे 7)तुकाराम भोसले 8)मारोती कोळी 9)ज्ञानेश्वर माने 10)प्रभाकर पवार हे सर्वजण एका पत्रा शेडमध्ये तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 4,150 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवले आहेत.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद: किरण दैन, रा. शेळगाव हे दि. 15 सप्टेंबर रोजी गावातील बस थांब्याजवळ 180 मि.ली. देशी दारुच्या 30 बाटल्या अवैध मद्य विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना अंबा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर सरमकुंडी फाटा येथे पंडीत क्षिरसागर हे 180 मि.ली. देशी दारुच्या 51 बाटल्या बाळगलेले वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले. तर शिवानंद पालमपल्ले, रा. कोळेवाडी हे नाईचाकुर- कासारशिरशी रस्त्यालगत देशी दारुच्या 11 बाटल्या बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद तीघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 चोरी

कळंब : कळंब नगरपरिषदेच्या दुकानासमोरील वर्षा आनंद फाटक, रा. दत्तनगर, कळंब यांच्या मालकीचे विद्युत यंत्रना फलक व लोखंडी अँगल असा 2,320 ₹ किंमतीचा माल अज्ञाताने दि. 13- 14 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web