वाशीत घरफोडी, २ लाख ६५ हजारचा ऐवज लंपास 

 
crime

वाशी  : फिर्यादी नामे- आशाबाई प्रकाश भोसले, वय 48 वर्षे, रा. अंजनसोंडा, ता. भुम जि. उस्मानाबाद यांचे  राहते घराचे पत्रयाचे शेड लक्ष्मण धोंडीबा गायकवाड, रा. अंजनसोंडा, ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी दि. 15.07.2023 रोजी 14.00 ते दि.22.07.2023  रोजी 07.00 वा. सु. उचकटून आत प्रवेश करुन घरातील 67 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे,चांदीचे जोडवे, आठ पोते ज्वारी, पाच पोते गहु, हरभरा दाळ 36 किलो, गॅस सिलेंडर, कोटींगचे 55 लिळ्या रंगाचे पत्रे असा एकुण 2,65,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. घरातील सामानाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या आशाबाई भोसले यांनी दि.25.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम-  454, 380, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : फिर्यादी नामे- आक्रमपाशा उमरसाहेब शेख, वय 43 वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे त्यांची बॅग पावसामुळे एका पांढऱ्या पोत्यात घालून मोटरसायकल वरुन त्यांचे गावी जात होते. दि. 25.07.2023 रोजी  14.00 वा. सु. नारंगवाडी चौकातील बेकरी समोर मोटरसायकल  उभी करुन बेकरीत गेले असता मोटरसायकलवर ठेवलेली बॅग ज्यामध्ये रोख रक्कम अंदाजे 3,50,000 ₹  बॅकेचे पासबूक, चेकबुक व कन्डंक्टरचा खाकी ड्रेस, बॅच बिल्ला हे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या आक्रमपाशा उमरसाहेब शेख यांनी दि.25.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web