विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या हॉटेल मालकास अटक 

 
crime

तुळजापूर - तुळजापूर शहरातील आरधवाडी परिसरातील जगत जननी हॉटेलचा चालक अक्षय नानासाहेब गायकवाड ( वय २४ ) हा  विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल वापरत असल्याची माहिती मिळताच, तुळजापूर पोलिसांनी या हॉटेल मालकाची दोन पंचासमक्ष झडती घेऊन हे पिस्टल हस्तगत केले. 

s


सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोहेकॉ साळुंके, क्षीरगिरे, ज्ञानेश्वर माळी यांनी  केली. 

पोहेकॉ अतुल यादव यांच्या फिर्यादीवरून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल प्रकरणी जगत जननी हॉटेलचा चालक अक्षय नानासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

From around the web