भांडण सोडवण्यास गेला आणि त्याचाच खून झाला ... 

लोहारा तालुक्यातील घटना 
 
Osmanabad police

लोहारा  : तालुक्यातील रुद्रवाडी एक जण मद्यधुंद अवस्थेत घरासमोर त्यांच्या पत्नी, आई व मुलांस मारहाण करीत होता. यावेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या शेजारच्या इसमास या तळीरामाने काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्या शेजारी इसमाचा मृत्यू झाला आहे. 

रुद्रवाडी, ता. लोहारा येथील शिवाजी चंद्रकांत शिंदे हे घरातील किरकोळ कारणावरुन दि. 08.09.2021 रोजी 02.30 वा. सु. मद्यधुंद अवस्थेत घरासमोर त्यांच्या पत्नी, आई व मुलांस मारहाण करीत होता. . यावेळी शेजारील- गुलचंद हरीबा शिंदे, बबन रंगा हराळे, सुखदेव मोरे हे ते भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनाही शिवाजी शिंदे यांनी काठीने मारहान करुन जखमी केले. या मारहानीत गुलचंद शिंदे या 60 वर्षीय वृध्दाच्या डोक्यात काठीने वार केल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- भालचंद्र हरीबा शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

उस्मानाबाद : एका 13 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) दि. 24.02.2021 रोजी 11.00 वा. सु. गावातीलच नात्यातील दोघा स्त्री- पुरुषांनी त्या मुलीस नवीन कपडे घेण्याचे अमिष दाखवून शेजारील गावी नेउन ती अल्पवयीन असतांना तीचा त्या गावातील एका तरुणाशी विवाह लावून दिला. यानंतर त्या तरुणाने त्या मुलीच्या इच्छेविरुध्द तीच्यासोबत वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास त्या तरुणाच्या कुटूंबीयांनी तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 366, 323, 506, 34 सह बाल विवाह अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम- 9, 10, 11 सह पोक्सो कायदा कलम- 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web