मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ 

बावी ( ढोकी ) गावात महिलेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या 
 
Osmanabad police

ढोकी  : श्रीमती कल्याणी अमित पाटील, वय 26 वर्षे, रा. बावी (ढोकी) यांनी दि. 18 ऑक्टोबर रोजी बावी (ढो.) शिवारातील विहीरीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. कल्याणी व अमित यांच्या लग्नात राहीलेला वर दक्षीना माहेरहुन आणन्याच्या तसेच कल्याणी यांना मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन पती- अमित मोहनराव पाटील, साधना पाटील, मोहनराव पाटील अशा तीघांनी वेळोवेळी कल्याणी यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून कल्याणी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या वसंत रामेश्वर चव्हाण, रा. खेड, ता. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (ब), 498 (अ), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीच्या दोन घटना 

मुरुम  : राम दिगंबर भोंडवे, रा. मुरुम, ता. उमरगा हे दि. 18 ऑक्टोबर रोजी 10.30 वा. सु. राहत्या कॉलनीतील थांबले होते. यावेळी बेरडवाडी, ता. उमरगा येथील अंबादास मंडले, गंगाराम मंडले, किरण ममाळे, आकाश ममाळे, शरण ममाळे, विकास मंडले अशा सहा व्यक्तींनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन राम भोंडवे यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गज, हंटरने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राम भोंडवे यांनी दि. 19 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लोहारा  : धानुरी येथील विलास मुरली लोहटकर, भागवत लोहटकर या दोघांनी शेतातील सामाईक बांधावरुन गुरे ने- आण करण्याच्या कारणावरुन दि. 17 ऑक्टोबर रोजी 17.30 वा. सु.धानुरी शिवारात गावकरी- तानाजी आबा बाबर यांना शिवीगाळ करुन, दगड फेकून मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तानाजी बाबर यांनी दि. 19 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 352, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web