जागा घेण्यासाठी माहेरहून पाच लाख घेऊन ये म्हणून छळ 

धाराशिवमध्ये नविवाहित महिलेची आत्महत्या 
 
crime

धाराशिव : माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शारिरीक व मानसिक छळ  व जाच केल्यामुळे शहरातील  बोंबले हनुमान चौकात राहणाऱ्या  पुजा संदीप जरंगे ( वय 23 वर्षे )  या नविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पुजा हिचे  पती नामे- संदीप जरंगे,रा. बोंबळे हनुमान चौक,धाराशिव तर सासरे- मधुकर जरंगे, सासु- कमल जरंगे, दिर दादा जरंगे सर्व रा. कळंब यांनी माहेराहुन जागा घेण्यासाठी  पाच लाख रु घेऊन ये असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ करुन त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून पुजा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील- दादा लक्ष्मण नागणे रा. मेंढापूर, ता. पंढरपुर जि. सोलापूर यांनी दि. 12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 498 अ, 304 (ब), 306, 323, 504, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


जुगार विरोधी कारवाई

 धाराशिव  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.12.06.2023 रोजी 17.25 वा. सु. आनंदनगर पो.ठा. हद्दीत छापा टाकला यावेळी आनंदनगर, उस्मानाबाद येथील- राहुल ऊर्फ रोमीत नानासाहेब गुळवे हे पशुवैदयकिय दवाखान्याच्या सिध्दीविनायक जनरल स्टोर दुकानामध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2,960 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत आनंदनगर पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web