मुरूममध्ये  गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

मुरुम : मुरुम पो. ठा. चे पथक दि. 08 ऑक्टोबर रोजी 15.30 वा. सु. कोथळी ते बेळंब रस्त्यावर गस्तीवर असतांना सोलापूर येथील अरविंद चनबसप्पा मंगरुळे हे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 0085 वरुन गुटख्याची 200 पुडके व तंबाखु जन्य पदार्थाचे 200 पुडके असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ अवैधरीत्या वाहून नेत असतांना पथकास आढळले. यावरुन मुरुम पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- दादाराव औसारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
पोलीस रात्रगस्ती दरम्यान दोघे संशयीत ताब्यात

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्वसवाच्या पार्श्वभुमीवर काल दि. 08 ऑक्टोबर रोजी 22.30 वा. सु. तुळजापूर शहरात गस्तीस होते. दरम्यान जवाहन गल्लीत अंधाराचा फायदा घेउन 1)श्रीकांत परशुराम गायकवाड, रा. सोलापूर 2) मंजुनाथ पिराजी गायकवाड, रा. पुणे हे दोघे संशयास्पदरित्या थांबलेले आढळले. अशा अवेळी तेथे उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्यांना विचारले असता ते पोलीसांना असंबध्द माहिती देत असल्याने पोलीसांनी त्या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web