सभासंदांनी दिलेले कर्जाचे हप्ते हडप, तुळजापुरात गुन्हा दखल 

 
crime

तुळजापूर : पवारवाडी, ता. उस्मानाबाद येथील- गुणवंत रामा मुंडे यांनी 01.04.2022 रोजी ते दि. 28.05.2022 रोजी पावेतो न्यु ऑपॉरच्युनिटी कन्सलल्टन्सी प्रा. लि. कंपनीचे नळदुर्ग  शाखा तुळजापूर येथे शाखेतील 18 सभासदांना छोटे लघुउद्योगकरीता दिलेल्या कर्जाचे हप्ते असे एकुण 53,505 ₹ सभासंदांनी सोपवलेले पैसे शाखेत भरण्याची जबाबदारी असताना शाखेत न जमा केले नसुन स्वताचे फायद्यासाठी स्वत:कडे ठेवून घेतले. यात मुंडे यांनी शाखेचा व महिला बचत गटातील 18 सदस्याचा विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या न्यु ऑपॉरच्युनिटी कन्सलल्टन्सी प्रा. लि. कंपनीचे  मॅनेजर- भिमराव दत्ता वरवटे यांनी दि.27.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 408,  409 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नुकसान करणे

आंबी  : चिंचपुर खु. ता. परंडा येथील- यशवंत तुळशीराम गरड  यांचे चिंचपुर शिवारातील शेत गट नं 148  मधील शेतातील उसाचे पिकाला, 4 आंब्याची झाडाला गावकरी- स्वप्नील गरड, नंदाबाई गरड यांनी दि.21.05.2023 रोजी .02.30 वा. सु. आग लावून दिली. या मध्ये यशवंत यांचे ऊस  व आंब्याचे झाड जाळून   14,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या यशवंत गरड यांनी दि. 27.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

तुळजापूर  : काक्रंबा, ता. तुळजापूर ग्रामस्थ- विशाल सुनिल बेडगे हे दि.26.05.2023 रोजी 23.00  वा. सु. आपल्या ताब्यातील  मोटरसायकल  क्रं एमएच 25 ए. व्ही 3757  ही सावरकर चौक तुळजापूर येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

From around the web