गावसूदमध्ये शेळ्या चोरणारा चोर अटकेत

 
Osmanabad police

उस्मानाबाद : गावसूद येथील सिताराम गिते यांच्या शेतातील शेडचा पत्रा दि. 24.10.2021 रोजी 22.30 वा. उचकटून आतील शेळ्या चोरण्याचा प्रयत्न ग्रामस्थ नागनाथ पेठे व सुनिल पवार हे दोघे करत होते. हा प्रकार गिते यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांच्या सहकाऱ्याने नागनाथ यास जागेवरच पकडले तर तर सुनिल हा एक शेळी चोरुन मोटारसायकलवर शेळीसह पसार झाला. यावरुन गिते यांनी दि. 25 ऑक्टोबर रोजी पहाटे पोलीस ठाणे गाठून दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

तुळजापूर  : उस्मानाबाद येथील सुनिता माने या दि. 25.10.2021 रोजी तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकातील बसमध्ये चढत असतांना त्यांच्या डाव्या हातातील 20 ग्रॅम वजनाची सोने धातूची बांगडी अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन चोरली. अशा मजकुराच्या माने यांनी दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web