धाराशिवमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार

 
crime

धाराशिव : शहरातील  एक 22 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 22.04.2023 रोजी 15.00 वा.सु. एकटी असताना एका तरुणाने सदर महीला ही एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कुठेही  वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.27.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 354, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 गावसुदमध्ये हाणामारी 

 गावसुद, ता. उस्मानाबाद येथील- विठ्ठल येडके, दाजी येडके, आप्पा येडके, गणेश येडके, उमेश येडके आन्य 2 या सर्वांनी बांध नांगरण्याचे कारणा वरुन दि.26.05.2023 रोजी 10.45  ते 11.00 वा. दरम्यान केकस्थळवाडी शेत सर्वे नं 466 मध्ये गावकरी- अशोक मारुती गाडेकर यांचे वडीलास काठीने मारहाण करत असताना अशोक हे त्यांचे वडीलाचे बचावास आले असता  विठ्ठल व आप्पा यांनी अशोक यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, काठीने मारुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक गाडेकर यांनी दि.27.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-143, 147,  148, 149, 324, 323, 427, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web