तामलवाडीचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिरी दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळयात 

लाचखोरीच्या ठपका असताना क्रीम पोस्टिंग पुन्हा मिळालीच कशी ?  
 
x
उस्मानाबाद पोलीस दलात प्रामाणिक अधिकारी साईडला, लाचखोरांची मात्र चांदी  

उस्मानाबाद - तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्हयात कारवाई न करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना सहा.पोलिस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ऐन महालक्षमी सणादिवशी ( १३ सप्टेंबर ) रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सन २०१६ मध्ये उमरगा पोलीस स्टेशनला असताना गिरी यास तीन हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याच  पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला होता. 

दरम्यान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी याच्यावर लाचखोरीचा ठपका असताना, त्यास साईड पोस्टिंग देण्याऐवजी क्रीम पोस्टिंग देण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे. उस्मानाबाद पोलीस दलात प्रामाणिक अधिकाऱ्याला  साईड पोस्टिंगला बसविण्यात आले आहे. लाचखोरांची मात्र चांदी सुरु आहे. नूतन पोलीस अधीक्षक नीवा जैन उस्मानाबाद पोलीस दलात फेरबदल करणार का ? याकडं लक्ष वेधले आहे.   


दि, १३ सप्टेंबर २०२१ : नेमणूक तामलवाडी पोलीस स्टेशन 

तक्रारदारांच्या भाऊ व वडील यांचे विरूद्ध पोलिस स्टेशन तामलवाडी येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी सहा.पोलिस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी  यांनी चार हजार रुपयांची मागणी करून चार हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व पांचासमक्ष चार हजार रूपये स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले.


दि. ३१ डिसेंबर २०१६ : नेमणूक उमरगा पोलीस स्टेशन 

 तक्रारदार यांच्या नातेवाईक महिलांना दाखल गुन्ह्यात अटक करून लाॅकअपमध्ये न टाकता त्याच दिवशी कोर्टात हजर करणेसाठी व त्यांची पोलीस कष्टडी न मागण्यासाठी तसेच गुन्ह्यचे तपासात पुढे मदत करण्यासाठी .पोलिस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी  यांनीतक्रारदार यांचेकडे तीन हजार रूपये लाचेची मागणी करून तीन हजार रूपये लाच रक्कम स्विकारली वगैरे वरून गुन्हा दाखल आहे. 

( पो.स्टे.उमरगा गु.र.नं. 493/2016 कलम 7,13(1)(ड) सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 ) 

गेल्या दोन वर्षात १५  ते २० पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तसेच लोकांना विनाकारण मारहाण केली म्हणून १० ते १५ पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  

चार हजार लाच घेताना तामलवाडीचा सहा.पोलिस उपनिरीक्षक गजाआड


 

From around the web