गौर : सासरच्या छळाला  कंटाळून नवविवाहित महिलेची आत्महत्या 

 
crime

येरमाळा  : सासरच्या छळाला  कंटाळून नवविवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना  गौर, ता. कळंब येथे घडली. सरीता प्रदिप ताकपिरे ( वय 25 वर्षे ) असे या नवविवाहित महिलेचे नाव आहे. 

सरीता हिचे पती-  प्रदिप ताकपिरे,  सासरे-कुमार ताकपिरे,  दिर-प्रविण ताकपिरे  यांनी घरगुती कारणावरुन सरीतास  शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून सरीताने   दि. 23.06.2023 रोजी  18.30 वा. सु. गौर येथे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. 

या आत्महत्या प्रकरणी मयत सरिताचे  वडील- बाबु सदाशिव ओव्हाळ रा. कात्रज आंबेगाव, ता. हवेली  यांनी दि. 24.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.सं. कलम- 306, 498(अ), 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

अपघातात एक ठार 

नळदुर्ग  : सलगरा, ता. तुळजापूर येथील- बजरंग रमेश मुळे, वय 31 वर्षे, हे दि.14.05.2023 रोजी 20.30 वा. सु. नळदुर्ग ते सलगरा येथे  मोटरसायकल  क्र एमएच 25 एएक्स 3941 ही वरुन जात होते.  दरम्यान गंधोरा गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वळणावरुन बजरंग यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालविल्याने नमूद मोटरसायकल ही स्लीप होवून बजरंग हे खाली पडून गंभीर जखमी होऊन उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे वडील- रमेश एकनाथ मुळे यांनी दि.24.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ)  सह मो.वा.का. कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web