उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार प्रतिबंधक कारवाई

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जुगार प्रतिबंधक कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 22.12.2021 रोजी 12 ठिकाणी छापे मारुन जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन 12 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 12 गुन्हे नोंदवले आहेत.

1) आनंदनगर, मुरुम ग्रामस्थ- राम कांबळे हे गावातील बस थांब्याजवळील शेडमध्ये मटका जुगार साहित्यासह 300 ₹ रक्कम बाळगलेले तर दाळींब ग्रामस्थ- संजय राठोड हे मटका जुगार साहित्यासह 560 ₹ रक्कम बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) उमरगा ग्रामस्थ- दत्तात्रय जमादार हे उमरगा येथील एका हॉटेलजवळ ऑनलाईन मटका जुगार साहित्यासह 1,690 ₹ रक्कम बाळगलेले तर मुळज, ता. उमरगा येथील सुर्यकांत भालके हे गावातील छ. शिवाजी महाराज चौकातील शेडमध्ये कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,360 ₹ रक्कम बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) वेताळनगर, तुळजापूर ग्रामस्थ- प्रशांत पंडागळे हे तुळजापूर येथे मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह 1,450 ₹ रक्कम बाळगलेले तर आपसिंगा ग्रामस्थ- नितीन कांबळे हे गावातील पशु दवाखान्यासमोरील जागेत मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह 1,220 ₹ रक्कम बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) इंदिरानगर, कळंब ग्रामस्थ- सचिन कदम हे गावतील बस स्थानकासमोरील शेडमध्ये कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,240 ₹ रक्कम बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

5) गंगेवाडी, ता. सोलापूर ग्रामस्थ- नेताजी जाधव हे तामलवाडी येथे मटका जुगार साहित्यासह 510 ₹ रक्कम बाळगले असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.

6) भुम ग्रामस्थ- गणेश मुसळे हे पाथरुड बस स्थानक परिसरात मटका जुगार साहित्यासह 670 ₹ रक्कम बाळगले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

7) जहागीरदारवाडी तांडा येथील सचिन राठोड व उस्मानाबाद येथील युवराज जाधव हे दोघे समतानगर, उस्मानाबाद येथील गॅस गुदामाच्यामागे ऑनलाईन चक्री जुगार साहित्यासह 17,650 ₹ रक्कम बाळगले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

8) अंबी, ता. भुम येथील संतोष समींदर हे रत्नापुर येथील बस थांब्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 2,000 ₹ रक्कम बाळगले असतांना अंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

9) केशेगांव, ता. तुळजापूर येथील शफीक शेख हे इटकळ येथील पानटपरीसमोर मटका जुगार साहित्यासह 460 ₹ रक्कम बाळगले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीवरुन उस्मानाबाद पोलीसांनी दि. 22.12.2021 रोजी 6 ठिकाणी छापे मारले ते खालीलप्रमाणे.

1) ढोकी पोलीसांनी 3 छापे मारले असता दत्तनगर पारधी पिढी, ढोकी येथील रेखा शिंदे व रक्मीनबाई शिंदे या दोघी राहत्या पिढीवर तर राजेशनगर, पारधी पिढी, ढोकी येथील युवराज शिंदे हे राहत्या पिढीवर असे तीघे हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा 950 ₹ लि. द्रव पदार्थ व 2.10 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना आढळले.

2) कल्पनानगर, कळंब येथील मंगल पवार या हावरगाव शिवारातील कारखान्याजवळ एका कॅनमध्ये 15 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) आरसोली, ता. भुम येथील आप्पा काळे हे आपल्या घरासमोर 7 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) काळे प्लॉट, उमरगा येथील विजय जाधव हे आपल्या घरासमोर 30 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी हातभट्टी दारु निर्मीती द्रव पदार्थ जागीच ओतून नष्ट केला तर अवैध मद्य जप्त करुन नमूद 6 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 6 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web