उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  उस्मानाबाद पोलीसांनी दि. 24.12.2021 रोजी जुगार प्रतिबंधक कारवाई दरम्यान 4 ठिकाणी छापे मारुन जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.

1) जुनी हवेली, वाशी ग्रामस्थ- रमेश मोळवणे हे पारा चौक, वाशी येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह 510 ₹ रक्कम बाळगलेले तर कन्हेरी ग्रामस्थ- भगवान रेडे, तुकाराम खरात, नरसींग खुटे, समाधान पवार, चच्छिंद्र काळे, वशिष्ठ लावंड, उत्तम कदम हे सर्व गावातील जि.प. शाळेच्या आवारात तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 3,950 ₹ रक्कम बाळगले असतांना वाशी पोलीसांना आढळले.

2) सेवालालनगर तांडा, कदेर, ता. उमरगा येथील रोहीत चव्हाण हे कदेर बस थांबाजवळ ऑनलाईन चक्री जुगार साहित्यासह मोबाईल फोन व रक्कम असा एकुण 12,600 ₹ मालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले.

3) फरीदनगर, कळंब येथील महेबुब आत्तार हे कळंब येथील साप्ताहीक बाराज मैदानात कल्यान मटका जुगार साहित्यासह 940 ₹ रक्कम बाळगले असतांना कळंब पोलीसांना आढळले.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीवरुन उस्मानाबाद पोलीसांनी दि. 24.12.2021 रोजी 11 ठिकाणी छापे मारले ते खालीलप्रमाणे.

1) पारधी पिढी, गोलेगाव ग्रामस्थ- आक्काबाई काळे या गोलेगाव शिवारात 15 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना वाशी पोलीसांना आढळले.

2) नळवाडी, ता. उमरगा ग्रामस्थ- शिवाजी जमादार हे दाळींब शिवारातील एका ढाब्याजवळ देशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना मुरुम पोलीसांना आढळले.

3) तडवळा (क.), ता. उस्मानाबाद येथील जानकी पवार व ताराबाई पवार या दोघी तडवळा येथील चौकात दोन वेगवेगळ्या ठिकाणी 25 लि. हातभट्टी दारु बाळगल्या असतांना ढोकी पोलीसांना आढळल्या.

4) अणदूर, ता. तुळजापूर येथील बालाजी बंदपट्टे हे आपल्या घरासमोर 10 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले.

5) शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील शाम शिंदे हे गावातील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या बाळगलेले तर पारधी पिढी, सांजा येथील सविता काळे या आपल्या पिढीवर 12 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना आनंदनगर पोलीसांना आढळल्या.

6) समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद येथील प्रभु राठोड हे आपल्या शेतात देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना बेंबळी पोलीसांना आढळले.

7) हिप्परगा (रवा), ता. लोहारा येथील विश्वनाथ कांबळे हे गाव शिवारात देशी दारुच्या 36 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकास आढळले.

8) शेकापूर, ता. परंडा येथील प्रमोद हिवरे व भांडगाव येथील लक्ष्मण भोसले हे आपापल्या गाव शिवारातील एका हॉटेलमागे अनुक्रमे देशी- विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या व हातभट्टी दारुने भरलेले 92 फुगे बाळगलेले असतांना परंडा पोलीसांना आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद 11 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 11 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web