उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक, चोरी, अपहरण आदी गुन्हे दाखल

शिराढोण : कोथळा, ता. कळंब येथील श्रीकृष्ण देविचंद हुंबे यांना दि. 20.11.2021 रोजी 09.30 वा. सु. टपालाद्वारे एक स्क्रॅच कार्ड व विनिंग कार्ड मिळाले. यावर हुंबे यांनी त्या कार्डवरील फोन क्रमांकावर संपर्क साधला असता त्या समोरील अज्ञात व्यक्तीने, “तुम्हाला 11,00,000 ₹ बक्षीस लागले असून बक्षीसाची रक्कम जमा करण्यासाठी टिडीएस रक्कम, जीएसटी रक्कम, एनओसी इत्यादीसांठी 1,00,000 ₹ रक्कम भरा.” असे हुंबे यांना सांगीतले. यावर हुंबे यांनी काहीएक विचार न करता त्या अज्ञात व्यक्तीने सांगीतलेल्या बँक खात्यात युपीआय प्रणालीद्वारे ती रक्कम भरली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे हुबे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शिराढोन पोलीस ठाणे येथे दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
नळदुर्ग : नळुदुर्ग, ता. तुळजापूर येथील विनायक रंगराव अहंकारी यांच्या घरात असलेल्या वडीलोपार्जीत सोने- चांदीच्या दागिन्यांपैकी 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 कि.ग्रॅ. चांदीची भांडी मागील सहा महिन्यांपासून दि.04.11.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विनायक अहंकारी यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील एक 15 वर्षीय मुलगी दि. 20.11.2021 रोजी रात्री तीच्या घरात कुटूंबीयांहस झोपलेली असतांना सकाळी कुटूंबीयांस ती दिसली नाही. यावर कुटूंबीयांनी तीचा परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती न मिळाल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघात
परंडा : देवीदास साधु जाधव, वय 39 वर्षे, रा. खंडेश्वरवाडी, ता. परंडा हे दि. 18.11.2021 रोजी 19.30 वा. सु. परंडा- सोनारी रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 4456 ही चालवत जात होते. प्रवासादरम्यान कुंभेजा पाटी येथे अज्ञात चालकाने इंडीका कार क्र. एम.एच. 42 एच 7993 निष्काळजीपने, चुकीच्या दिशेने चालवून देवीदास जाधव यांच्या मोटारसायकलीस समोरुन धडक दिली. या अपघातात देवीदास जाधव हे गंभीर जखमी होउन मयत होउन त्यांच्या मो.सा. चे नुकसान झाले. अशा मजकुराच्या मयताचे मुव्हने- अशोक विठ्ठल नरके, रा. खंडेश्वरवाडी यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.