उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक, चोरी, मारहाण गुन्हे दाखल
कळंब : हावरगाव, ता. कळंब ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त बँक खाते असून या खात्यात महाराष्ट्र शासनाकडून विकास कामांसाठी प्राप्त झालेले 11,90,651 ₹ रक्कम या खात्यात होती. तत्कालीन सरपंच- अनिता गौतम हजारे व तत्कालीन ग्रामसेवक- महेश शिंगाडे यांनी ती रक्कम खात्यातून काढून तीचा अपहार केला आहे. यावरुन पंचायत समिती कळंब येथील विस्तार अधिकारी- तुकाराम जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
मुरुम : दस्तापूर, ता. लोहारा येथील ‘विठ्ठल-साई’ मंदीराच्या सभामंडपातील अंदाजे 12,000 ₹ रक्कम असलेल्या दोन दानपेट्या दि. 22.12.2021 रोजी 00.30 वा. सु. अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या परुषोत्तम शर्मा यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहान
तुळजापूर : तुळजापूर येथील राजेंद्र दिगंबर माने व अभिषेक या पिता- पुत्रांच्या गटाचा गावकरी- विशाल विजयकुमार छत्रे, प्रशांत कांबळे, सुरज साठे, योगेश दळवी, अमित आरगडे, अभिषेक गायकवाड यांच्या गटाशी दि. 23.12.2021 रोजी 11.00 वा. सु. तुळजापूर न्यायालयासमोरील रस्त्यावर जुना वाद उद्भवला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांस अश्लील शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजेंद्र माने व विशाल छत्रे यांच्या परस्परविरोधी प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 323, 294, 504, 506 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा : उमरगा येथील डिग्गी रस्त्यावरील वडापाव गाडा चालक- रफीक नदाफ यांची गावकरी- शेखर कुशाळकर यांच्याकडे उधारी बाकी असल्याने त्यांनी शेखर यांच्या आजोबास ती रक्कम मागीतली. या रागातून शेखर यांनी दि. 23.12.2021 रोजी 14.00 वा. रफीक यांच्या हातगाड्यातील झारा रफीक यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. तसेच वडापाव हातगाडा जाळून टाकण्याची धमकी दिली.