उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक, चोरी, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील दुर्गादास केशवराव पवार यांची करजखेडा येथील गट क्र. 538 मधील जमीन ही राष्ट्रीय महामार्ग क्र. 261 च्या चौपदरीकरणासाठी संपादीत झाली आहे. त्याचा मोबदला दुर्गादास यांना मिळू नये यासाठी नमूद प्रकरणी करजखेडा ग्रामस्थ- धनाजी पांडुरंग पवार यांनी त्या जमीनीचे स्वत: मालक असल्याचे बनावट कागदपत्रे ते खरे आहेत असे भासवून नोव्हेंबर 2017 पासून उस्मानाबाद न्यायालयात सादर करुन त्यांनी दुर्गादास पवार यांसह शासनाची दिशाभुल करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या दुर्गादास पवार यांनी प्रथमवर्ग न्यायालय, उस्मानाबाद येथे दिलेल्या अर्जाच्या चौकशी अंती न्यायालयाच्या आदेशावरुन भा.दं.सं. कलम- 420, 467, 468, 511, 471 अंतर्गत गुन्हा दि. 02.01.2022 रोजी नोंदवला आहे.

 
चोरीचे दोन गुन्हे 

उमरगा  : माडज, ता. उमरगा येथील विनोद व्यंकट गायकवाड व संभाजी पंडू पाटील या दोघांच्या घराचे बंद कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 02.01.2022 रोजी 11.30 ते 12.00 वा. दरम्यान तोडून गायकवाड यांच्या घरातील 14 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 5,000 ₹ रक्कम आणि पाटील यांच्या घरातील 20,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विनोद गायकवाड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : केशेगाव, ता. तुळजापूर येथील दिपक स्वामीनाथ जळकोटे यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीएस 3571 ही दि. 02.01.2022 रोजी रात्री 01.00 ते 06.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या दिपक जळकोटे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा येथे  मारहाण 

उमरगा  : ब्रम्हपुरी कॉलनी, उमरगा येथील भाविका कुमार एकिले यांसह कुटूंबातील 3 व्यक्ती यांच्या गटाचा कॉलनीतीलच- सुवर्णा महादेव मंठाळे यांसह कुटूंबातील 5 व्यक्तींच्या गटाशी जुन्या वादातून दि. 31.12.2021 रोजी 21.00 ते 21.30 वा. सु. राहत्या कॉलनीत हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांतील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या भाविका एकीले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 147, 148, 149 अंतर्गत तर सुवर्णा मंठाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत असे 2 गुन्हे दि. 02.01.2022 रोजी नोंदवले आहेत.

                                                                                               

From around the web