उस्मानाबादच्या सुशिलादेवी नागरी पतसंस्थेकडून पिराजी मंजुळे यांची फसवणूक 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : येथील सुशिलादेवी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष बालाजी मोहन साळुंके यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे कार्यकर्ते पिराजी मंजुळे यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

उस्मानाबाद येथील पिराजी बाबुराव मंजुळे यांनी कर्ज मिळण्याकामी आवश्यक कागदपत्रे सुशिलादेवी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष- बालाजी मोहन साळुंके यांना दि. 01.02.2021 रोजी दिली होती. या कागदपत्रांच्या सहायाने बालाजी साळुंके यांनी पिराजी यांच्या नावे परस्पर कर्ज उचलून पिराजी यांची फसवणूक केली. अशा मजकुराची तक्रार पिराजी यांनी फौ.प्र.सं. कलम- 156 (3) नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्र. 5, उस्मानाबाद येथे दिली होती. नमूद तक्रारीसंबंधी चौकशी करण्याचा न्यायालयीन आदेश झाल्याने भा.दं.सं. कलम- 420, 467, 468, 469 अंतर्गत गुन्हा आज दि. 30.10.2021 रोजी नोंदवला आहे.

महिलेचा विनयभंग 

उस्मानाबाद : रस्त्या बाजूस खेळणी, सजावट साहित्य विक्री करत असलेल्या एका 30 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) दि. 29.10.2021 रोजी 13.30 वा. सु. एक तरुण, “तु मला आवडतेस तुझा फोन क्रमांक दे.” असे म्हणाला. यावर त्या महिलेने त्यास टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने तीला शिवीगाळ करुन चापटा मारुन “अग तु माझे काय बिघडवनार, माझ्या मागे भरपूर पाठबळ आहे.” असे धमकावले. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
दोन अपघात 

येरमाळा  : अंदाजे 60 वर्षाचा मनोरुग्ण पुरुष येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील उड्डान पुलावरुन दि. 04.09.2021 रोजी 20.30 वा. सु. पायी जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होउन मयत झाला. या अपघातानंतर संबंधीत अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने अपघातस्थळावरुन वाहनासह पलायन केले. अशा मजकुराच्या येरमाळा पो.ठा. येथील पोउपनि- श्री. नजरोद्दीन नाईकवाडी यांनी दि.  29.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : वाघोली (भि.) येथील साहेबराव साळुंके व त्यांचा मुलगा- ओमप्रकाश हे दोघे दि. 29.10.2021 रोजी 16.30 वा. सु. कळंब येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 9921 ने प्रवास करत होते. यावेळी पिकअप क्र. एम.एच. 05 बीएच 4561 च्या धडकेत ते पिता- पुत्र गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद पिकअप वाहनाचा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या साहेबराव साळुंखे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web