उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक, अपहरण, चोरीचे गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

येरमाळा : शेलगाव (ज.), ता. कळंब येथील सुनिल विष्णु तवले यांचे लग्न जमवण्यासाठी कुंभारी, ता. सोलापूर (दक्षिण) येथील सुरेश खेत्री यांनी सुनिल यांच्याकडून 20,000 ₹ घेउन अजनळे, ता. ईडी, जि. विजापूर, राज्य- कर्नाटक येथील भाग्यश्री पांडुरंग मोरे यांच्याशी सुनिल यांचा दि. 06.11.2021 रोजी चडचण, जि. विजापूर येथे साखरपुड केला. 

यानंतर भाग्यश्रीची आई आजारी असल्याचे कारण सांगूण तीच्या उपचारासाठी मध्यस्थी सुरेश खेत्री वेळोवेळी पैसे मागत होते. यानंतर दि. 09.11.2021 रोजी चडचण येथे सुनिल व भाग्यश्री यांचा विवाह झाल्यानंतर भाग्यश्री या दि. 10.12.2021 रोजी 03.00 वा. सु. शेलगाव येथील तीच्या माहेराहुन कोणास काही एक न सांगता अंगावरील सोने- चांदीच्या दागिन्यांसह निघून गेल्या. पती- सुनिल तवले यांनी पत्नी- भाग्यश्री हिस वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. यावरुन सुरेश खेत्री व भाग्यश्री मोरे या दोघांनी आपली फसवणूक केल्याचे सुनिल तवले यांना समजले. अशा मजकुराच्या सुनिल तवले यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 16.12.2021 रोजी पहाटे 05.30 वा. सु. तीच्या अंथरुणावर कुटूंबीयांस न दिसल्याने त्यांनी तीचा शोध घेउन परिचितांकडे विचारपुस केली असता शेजारील गावच्या एका 22 वर्षीय तरुणाने तीचे अपहरन केले असल्याचे समजले. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

 
चोरीचे तीन गुन्हे 

नळदुर्ग : आरळी (खु.), ता. तुळजापूर येथील रविंद्र मधुकर पाटील यांनी आपल्या शेतात ठेवलेल्या 12 फुटी 20 लोखंडी पत्रे ठेवले होते. त्यातील 6 पत्रे दि. 28.10.2021 रोजी 18.00 वा. सु. गावातीलच एका संशयीताने चारुन नेले आहेत. अशा मजकुराच्या रविंद्र पाटील यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : वडार गल्ली, उस्मानाबाद येथील दुर्गाप्पा गुंडीबा पवार यांची स्कुटर क्र. मए.एच. 25 एटी 6914 ही दि. 13.12.2021 रोजी रात्री 01.30 ते 04.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दुर्गाप्पा पवार यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : उमरगा येथील भिमाशंकर काशीनाथ देवकर यांची हिरो पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 5985 ही दि. 21.12.2021 रोजी 18.30 ते 19.30 वा. दरम्यान देवकर यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या भिमाशंकर देवकर यांनी दि. 22‍ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web