उस्मानाबाद जिल्ह्यात २४ नोव्हेंबर रोजी फसवणूक, अपहरण, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  “माझ्याकडे सलुनचे सामान असुन तुम्हाला कमी किंमतीत देतो.” असा एका अनोळखी फोन क्रमांकावरुन कॉल साबेर सलीम शिकलकर, रा. उस्मानाबाद यांना दि. 13.11.2021 रोजी 18.00 वा. आला. तसेच समोरील त्या अज्ञात व्यक्तीने शिकलकर यांच्या भ्रमणध्वनीवर त्या साहित्याची यादी पाठवली असता शिकलकर यांनी सामान खरेदी करण्यासाठी समोरील व्यक्तीस संपर्क साधला. यावर त्या अज्ञाताने साहित्य किंमतीची अर्धी रक्कम युपीआय प्रणालीद्वारे पाठवण्यास सांगीतली. यावर शिकलकर यांनी काही एक विचार न करता त्या व्यक्तीस युपीआय प्रणालीद्वारे 40,000 ₹ रक्कम पाठवली. यानंतर त्या समोरील अज्ञाताने उर्वरित रकमेची मागणी केली असता शिकलकर यांनी पुन्हा 43,726 ₹ रक्कम त्या व्यक्तीस पाठवली. यानंतर शिकलकर यांनी त्या समोरील व्यक्तीस वेळोवेळी त्या सामानाची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली तसेच रक्कमही परत केली नाही. अशा मजकुराच्या साबेर शिकलकर यांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील एक 17 वर्षीय मुलगी दि. 11.11.2021 रोजी पहाटे 05.00 वा. आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. यावरुन कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पालकांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

मारहाण 

ढोकी  : खामगाव, ता. उस्मानाबाद येथील प्रल्हाद शिनगारे, सौरभ काटवटे, अमर शिनगारे, समाधान शिनगारे यांनी पुर्वीच्या वादावरून दि. 22.11.2021 रोजी 20.30 वा. सु. अशोक हिरामन अंधारे यांच्या घरासमोर अशोक यांसह त्यांचा पुतण्या- विशाल यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या अशोक अंधारे यांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                            

From around the web