तुळजापूर तालूका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर तालूका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी अनुसुचित जमातीच्या खातेदार- सुमित्रा पांढरे यांचा धनादेश नोव्हेंबर 2018 ते जुलै 2021 दरम्यान फसवणूकीद्वारे एका बँकेत सादर करुन वटवण्याचा प्रयत्न केला. तसेच संचालकांनी या धनादेशाबाबत सुमित्रा पांढरे यांना वकीलामार्फत सुचनापत्र पाठवून त्यांची बदनामी केली. अशा मजकुराच्या सुमित्रा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 420, 467, 468, 471 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

वाशी : माळेवाडी, ता. भुम येथील आशाबाई शिंदे या दि. 27 सप्टेंबर रोजी 14.00 वा. सु. माळेवाडी गट क्र. 112 मधील शेतात पिकाची काढणी करत होते. यावेळी शेतातील पिक काढणीच्या वादातून ग्रामस्थ- लिमकर कुटूंबातील बब्रुवान, बाळासाहेब, उमेश, मथुराबाई, भाग्यश्री अशा पाच व्यक्तींनी आशाबाई यांना अश्लील शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आशाबाई यांनी दि. 30 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 337, 509, 143, 147, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web