उस्मानाबादेत तोतया पोलिसांकडून फसवणूक 

अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास 
 
Osmanabad police

उस्मानाबाद : उस्मानाबादेत तोतया पोलिसांचा सुळसुळाट झाला आहे. या तोतया  पोलिसांकडून लोकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी खरेखरे पोलीस मात्र मूग  गिळून गप्प आहेत. 

वकील कॉलनी, उस्मानाबाद येथील पुरोहीत- चंद्रकांत रामचंद्र महाजन हे  दि. 13.01.2022 रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद एमआयडीसी मधील एका रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकलवरील एका अनोळखी पुरुषाने पोलीस असल्याची बतावणी करुन चंद्रकांत यांना त्यांच्या हातातील अंगठी रुमालात बांधून खीशात ठेवण्यास सांगितले.

यावर चंद्रकांत यांनी त्या पुरुषास आपली 5 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी व रुमाल दिला असता त्याने ती अंगठी रुमालात गुंडाळल्याची हातचलाखी करुन फक्त गुंडाळलेला रुमाल चंद्रकांत यांना देउन ती अंगठी घेउन निघून गेला. थोड्या वेळाने चंद्रकांत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा मजकुराच्या चंद्रकांत महाजन यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 170 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबादेत यापूर्वीही अश्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र या तोतया पोलिसांचा शोध लावण्यात खऱ्याखुऱ्या पोलिसांचा  यश आलेले नाही. 

From around the web