उस्मानाबाद जिल्ह्यातील चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका 35 वर्षीय पुरुषाने त्याच्या गल्लीतीलच एका 4 वर्षीय बालकास (नाव- गाव गोपनीय) दि. 18.01.2022 रोजी 13.00 वा. सु. आपल्या घरी नेउन त्याच्या सोबतअनैसर्गीक असे लैंगीक कृत्य केले. अशा मजकुराच्या बालकाच्या आजीने दि. 19 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 377 सह बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
उमरगा : त्रिकोळी, ता. उमरगा येथील विठ्ठल अंबादास कुरलेकर यांनी दि. 18.01.2022 रोजी सायंकाळी 05.30 वा. सु. पैसे देउनही कामस न आल्याच्या कारणावरुन रामलिंग (मुदगड), ता. निलंगा, जि. लातूर येथील खंडप्पा बुध्दीवंत जिरे यांना गावातील दर्गा परिसरात शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, कंबर पट्ट्याने मारहान करुन खंडप्पा यांना जखमी केले. अशा मजकुराच्या खंडप्पा जिरे यांनी दि. 19 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : तुळजापूर येथील संकेत अनिल शिंदे यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीराच्या ईमारतीतील पहिल्या मजल्यावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक- सुरवसे सागर नागनाथ यांस दि. 18.01.2022 रोजी 14.38 वा. सु. अश्लील भाषेत शिवीगाळ करुन मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मंदीर संस्थानाचे सहायक व्यवस्थापक- नागेश शितोळे यांनी 19 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 294, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.