उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उमरगा  : बालाजीनगर, उमरगा येथील राहुल राजकुमार हेबळे यांची फोर्ड कार क्र. के.ए. 03 एडी 2240 ही दि. 15- 16.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या राहुल हेबळे यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : सोलापूर येथील मिनाज महेबुब पटेल यांच्या काटकाव येथील गट क्र. 394 मधील शेत विहीरीवरील 5 अश्वशक्ती क्षमतेचा टेक्स्मो विद्युत पंप दि. 23- 24.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या मिनाज पटेल यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत उमरगा तालुक्यातील येणेगुर ग्रामस्थ- स्नेहा विशाल देवमानकर या दि. 23.01.2022 रोजी 13.00 वा. सु. मैलारपुर येथील खंडोबा मंदीरात दर्शनासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र श्रीमती स्नेहा यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या स्नेहा देवमानकर यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : भातंब्री, ता. तुळजापूर येथील शेषेराव भानुदास बंडगर यांच्या शेत गट क्र. 84 मधील विहीरीवरील 5 अश्वशक्ती क्षमतेचा ज्योती विद्युत पंप दि. 21- 22.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री गावातीलच तीघा संशयीत पुरुषांनी चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या शेषेराव बंडगर यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web