उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

वाशी : देवडीकर प्लॉट, वाशी येथील सुनिल अंबादास गाडे यांच्या घराचा दरवाजा दि. 29- 30.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कटावणीच्या सहाय्याने उचकटून आतील 35 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 50 ग्रॅम वजनाचे पैंजण, टायटन घड्याळ व 2,000 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुनिल गाडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : उमरगा येथील सुभाष श्रीमंत समाने यांच्या जकेकुर गट क्र. 249 / 2 /2 मधील शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 08- 09.12.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुभाश समाने यांनी दि. 30 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा  : उपळाई, ता. कळंब येथील श्रीराम वणवे यांच्या बंद घराचे कुलूप दि. 29.12.2021 रोजी 16.00 ते 18.00 दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 18 ग्रॅम सुवर्ण दागिने व रोख रक्कम 20,000 ₹ चोरुन नेली. अशा मजकुराच्या वणवे यांनी दि. 30 दिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : काटगाव येथील एका समाज मंदीरातील सुमारे 50,000 ₹ किंमतीच्या दोन चांदीच्या मुर्ती दि. 29- 30.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या ग्रामस्थ- बसन्ना कळबंडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात 

उस्मानाबाद : पिंपरी, ता. उस्मानाबाद येथील शंकर किसन माळी हे दि. 16.12.2021 रोजी 15.30 वा. सु. देशपांडे स्थानक, उस्मानाबाद येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने स्कुटर क्र. एम.एच. 25 एयु 9067 ही निष्काळजीपने चालवल्याने शंकर माळी यांच्या मो.सा. ला पाठीमागून दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- राधा शंकर माळी यांनी दि. 30 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web