धाराशिव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच ,  तीन अपघातात चार ठार

 
crime
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षभरापासून दररोज कुठं ना कुठं अपघात होत असून, यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. ही  अपघाताची मालिका सुरूच असून, जिल्ह्यात तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

धाराशिव  : आळणी, ता. उस्मानाबाद येथील-धनंजय शिवाजी विर हे दि.19.06.2023 रोजी 10.15 ते 10.30 वा. सु. अळणी फाटा येथील शिवनेरी हॉटेलचे समोर रस्त्याच्या कडेला उभे होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 13 डीआर 7781 चा चालक नामे बाळु इराप्पा कोरे, रा. भोसा, ता. कळंब यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून धनंजय यांना साईडने धडक दिल्याने धनंजय हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या वैभव संभाजी विर यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :निलकंट, ता. बसवकल्याण येथील- विष्णु सुधाकर येवते, वय 25 वर्षे, सोबत शिवराज मारुती येवते हे दोघे  दि.18.06.2023 रोजी 19.30 वा. सु. बायपास रोड उमरगा त्रिकाळी चौक एनएच 65 वर मोटरसायकल क्र के.ए. 56 ई 2759 वरुन बसवकल्याण येथुन गुंजोटीकडे जात होते. दरम्यान कार क्र एमएच 12 जेएम 6977 चा चालक नामे दत्तात्रय रामराव यशवंते रा. उमरगा यांनी त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवल्याने विष्णु यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात विष्णु हे गंभीर जखमी होउन मयत झाले. तर शिवराज हे जखमी झाले. अशा मजकुराच्या शिवराज येवते यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  :मुरुमखेडा, ता. संभाजीनगर येथील- विठ्ठल आसाराम दाभाडे, वय 45 वर्षे, सोबत त्यांचा मित्र विक्रम जनार्धन कुबेर, वय 35 वर्षे हे दोघे दि.30.06.2023 रोजी 13.00 वा. सु. सरमकुंडी फाटा येथे मोटरसायकल  वरुन जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवल्याने विठ्ठल यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात विठ्ठल व विक्रम  हे  दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद अज्ञात वाहनाचा चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे भाउ बाबासाहेब आसाराम दाभाडे यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

कळंब  : परळी रोड, कळंब येथील- शुसान गौरे चौधरी यांनी दि. 29.06.2023 रोजी 23.20 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रं. एम.एच.13 बीके 1826 ही कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web