शेतातील बांध  टोकरण्याच्या कारणांवरुन दोन गटात हाणामारी , चार जखमी 

 
crime

ढोकी  : आरोपी नामे- 1) आत्माराव रानबा शिंदे, 2) अक्षय आत्माराम शिंदे यांनी दि.02.09.2023 रोजी 15.00 वा. सु. पळसप येथील शेत गट नं 799 पळसप शिवार येथे फिर्यादी नामे- बालाजी रानबा शिंदे, वय 45 वर्षे,रा पळसप, ता. जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीने शेतातील बांध टोकारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन फिर्यादीचा मुलगा विजयकुमार यास कुह्राडीच्या दांड्याने मारुन व चावा घेवून जखमी केले. तसेच तु जर शेतात आला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी बालाजी शिंदे यांनी दि.02.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : आरोपी नामे- 1) विजयकुमार बालाजी शिंदे ,2) बालाजी रानबा शिंदे, वय 45 वर्षे,रा पळसप, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.02.09.2023 रोजी 16.00 वा. सु. शेत गट नं 799 पळसप शिवार येथे फिर्यादी नामे- आकाश आत्माराम शिंदे, वय 22 वर्षे, पळसप ता. जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीने शेतातील बांध टोकारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन कुह्राडीचे दांड्याने व खांद्यावर चावा घेवून मारुन जखमी केले. तसेच आकाश यांचे वडील आत्ताराम शिंदे हे त्याचे बचावास आले असता त्यांनाही कुह्राडीच्या दांड्याने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी आकाश शिंदे यांनी दि.02.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बामणी मध्ये हाणामारी 

बेंबळी  : आरोपी नामे- 1) अमोल शिवाजी काळे, 2) प्रतिक्षा अमोल काळे, रा. बामणी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 02.09.2023 रोजीचे 19.00 वा. सु. बामणी शिवार येथे फिर्यादी नामे- शिवाजी पांडुरंग शेळके, वय 63 वर्षे, रा. बामणी, ता. जि. उस्मानाबाद यांना शेत रस्त्याच्या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी शिवाजी शेळके यांनी दि.02.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 सह अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web