उस्मानाबाद जिल्ह्यात १२ डिसेंबर रोजी चार अपघातात चार जखमी 

 
Osmanabad police

उमरगा  : एकुरगा, ता. उमरगा ग्रामस्थ- लिंबाजी लक्ष्मण कुन्हाळे, वय 70 वर्षे हे दि. 07.12.2021 रोजी 13.30 वा. सु. कोरेगाववाडी फाटा येथील रस्त्याने पायी जात होते. यावेळी पिकअप क्र. के.ए. 42 बी 2155 ने लिंबाजी कुन्हाळे यांना पाठीमागून दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद पिअकपचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला.

दुसऱ्या हिप्परगा, ता. उमरगा ग्रामस्थ- घटनेत विश्वनाथ रामराम मुळे हे दि. 08.12.2021 रोजी 09.00 वा. सु. गावातील तुरोरी रस्त्याने पायी जात असतांना गावकरी- कृष्णा दत्तु भोसले यांनी बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 पी 4581 हे निष्काळजीपने चालवून विश्वनाथ यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

अशा मजकुराच्या लिंबाजी कुन्हाळे व विश्वनाथ मुळे या दोघांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद  : अनसुर्डा, ता. उस्मानाबाद येथील नंदा शाहु गरड, वय 44 वर्षे या त्यांच्या मुलासह दि. 09.12.2021 रोजी 19.00 वा. सु. उस्मानाबाद येथील महामार्ग क्र. 52 वरील वरुडा रोड उड्डान पुलाजवळून मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 8256 ने प्रवास करत होत्या. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 24 बीजे 3306 ने गरड यांच्या मो.सा. ला पाठीमागून दिलेल्या धडकेत नंदा गरड यांसह त्यांचा मुलगा किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या नंदा गरड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन नमूद मो.सा. च्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : मालवाहतुक गाडी क्र. एम.एच. 25 एजे 3885 च्या अज्ञात चालकाने दि. 05.12.2021 रोजी 20.30 वा. सु. हंगरगा (नळ) फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर नमूद वाहन निष्काळजीपने चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या जळकोट ग्रामस्थ- सुभाष राम सोनटक्के यांना पाठीमागून धडक दिल्याने सोनटक्के हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सुभाष सोनटक्के यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web