धाराशिव शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी , चार जखमी

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1)खाजा दगडू सौदागर,2) पाशा दगडू सौदागर, 3) अब्दुल गन्नी काशीरामसाहब कुरेशी, 4) शहाबाज खाजा सौदागर,5) जिन्नत खाजा सौदागर, 6) रुकीया पाशा सौदागर सर्व रा. आगडगल्ली उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी घराचे बांधकाम करण्याचे कारणावरुन दि.04.08.2023 रोजी 17.30 वा. सु. आगडगल्ली उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे-अब्दुलबारी दगडू सौदागर, वय 55 वर्षे, रा.आगडगल्ली उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांचा मुलगा इरफान यास घराचे बांधकाम करायचे नाही असे  म्हणून अब्दुलबारी व त्यांचा मुलगा यांना गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, लाकडांनी, दगडाने,कोयतृयाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अब्दुलबारी सौदागर यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव   : आरोपी नामे-1)अब्दुलबारी दगडू सौदागर, 2) इरफान अब्छुलबारी सौदागर, 3) बिल्कीस इरुान सौदागर,4) इम्रान अब्दुलबारी सौदागर, 5) वाहेद अब्छुलबारी सौदागर सर्व रा. आगडगल्ली उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.04.08.2023 रोजी 18.00 वा. सु. आगडगल्ली उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे-झिनत खाजा सौदागर वय 45 वर्षे, रा.आगडगल्ली उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद या इरफान यास म्हणाल्या की तु मागील भांडणाचा व्हिडीओ पाहुणेराउळे यांचे हॉटसअपवर का पाठवून दिला असे विचारले असता इरफान सौदागर यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, लोखंडी रॉडने कपाळावर मारुन जखमी केले. तसेच झिनत यांचे पती त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या झिनत सौदागर यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :आरोपी नामे- 1) बसप्पा नरसप्पा जमादार, 2) रितेश बसप्पा जमादार अन्य 1 रा. निलेगाव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी शेतात जणावरे चारण्याचे कारणावरुन दि. 30.07.2023 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. निलेगाव शिवारात सुकाचार्य दुपारगुडे यांच्या शेताजवळ फिर्यादी नामे- गंगय्या पंचय्या स्वामी, वय 60 वर्षे रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना शेतात जणावरे चारायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, लोखंडी रॉडने गंगय्या यांचे डाव्या हातावर मरुन गंभीर जखमी करुन हाताचे हाड फॅक्चर केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गंगय्या स्वामी यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 323,  147, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भूम  :आरोपी नामे- 1) अतुल माणिक नायकिंदे, 2) माणिक अंबादास नायकिंदे, 3) अमोल माणिक नायकिंदे सर्व रा. पाटसांगवी, ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी शेतातील बांधावरील गवत कापण्याचे कारणावरुन दि. 03.08.2023 रोजी 11.00 वा. सु. पाटसांगवी शिवारात फिर्यादी नामे- बप्पा कालीदास नायकिंदे, रा. पाटसांगवी, ता. भुम जि. उस्मानाबाद यांना शेतातील बांधावरील गवत का कापले असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी गजाने, खुरप्याने व दगडाने बप्पा यांचे डाव्या हातावर मरुन गंभीर जखमी केले. तसेच बप्पा यांचे बचावास त्यांची पत्नी  श्रध्दा या आल्या असता त्यासही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बप्पा नायकिंदे यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web