उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 
Osmanabad police

उमरगा : उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील मिनाक्षी दिलीप पाटील यांच्या कुटूंबाचा ग्रामस्थ- विजया चंद्रकांत जाधव यांच्या कुटूंबाशी भुखंड मालकीच्या कारणावरुन जुना वाद असून त्या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल आहे. यातून दि. 26.12.2021 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गल्लीत मिनाक्षी पाटील यांसह एका महिलेचा व विजया जाधव यांसह 5 व्यक्तींच्या गटाशी तो वाद उद्भवून त्याचे पर्यावसान हानामारीत झाले. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिनाक्षी पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर विजया जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 447, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तेर, ता. उस्मानाबाद येथील ओम दिलीप पेठे हे दि. 26.12.2021 रोजी 17.30 वा. सु. गावकऱ्यास उसने पैसे परत करत होते. यावेळी ग्रामस्थ- दत्ता उध्दव देवकुळे व संतोष मच्छिंद्र देवकुळे यांनी तेथे जाउन, “मला पण हात उसणे पैसे घ्यायचे असून त्या पैशासाठी तु माझी हमी घे.” असे म्हणाले. यावर हमी घेण्यास ओम पेठे यांनी नकार दिल्याने नमूद दोघांनी ओम यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच संतोष देवकुळे यांनी ओम यांच्या हातावर, खांद्यावर, गालावर दाढीच्या ब्लेडने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ओम पेठे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : शेजाऱ्याच्या शेतातील पिकास पाणी न दिल्याच्या कारणावरुन ईटकुर, ता. कळंब येथील भारत गंभीरे, गोविंद गंभीरे, दिलीप गंभीरे, सुरेश गंभीरे, सारीका गंभीरे, शिला, गंभीरे, रेखा गंभीरे, सरस्वती गंभीरे या सर्वांनी दि. 24.12.2021 रोजी 04.00 वा. सु. ईटकुर शिवारात व गावातील छ. शिवाजी महाराज चौकात भाऊबंद- किरण गोविंद गंभीरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी फावडे, पाईप, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी किरण यांच्या बचावास सरसावलेल्या त्यांच्या पत्नीसही नमूद लोकांनी मारहान केली. अशा मजकुराच्या किरण गंभीरे यांनी दि. 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 341, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : घराजवळ आदली फटाका उडवण्याच्या कारणावरुन सुकटा, ता. भुम येथील ज्ञानोबा नरके यांना गल्लीतील- एकनाथ गलांडे, रोहीत पांढरे, दत्ता पांढरे, सचिन जानकर यांनी ज्ञानोबा यांना मारहान केली होती. याचा जाब विचारण्यास ज्ञानोबा व चुलत भाऊ- शांताराम लक्ष्मण नरके असे दोघे दि. 24.12.2021 रोजी 21.00 वा.सु. नमूद लोकांकडे गेले असता त्यांनी दोघा नरके बंधुंना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी देउन ज्ञानोबा यांच्याजवळील मोबाईल घेउन गेले. अशा मजकुराच्या शांताराम नरके यांनी दि. 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web