उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी : खडकी तांडा, ता. तुळजापूर येथील तुळशीदास व राम उध्दव काळे या दोघा भवांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 16.12.2021 रोजी 19.30 वा. सु. भाऊ- सोमनाथ उध्दव काळे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वेळुने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सोमनाथ काळे यांनी दि. 18 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : शेंडी फाटा, ता. वाशी येथील शिंदे कुटूंबातील लाला, सुनिल, गणेश, जालिंदर, आप्पा, बाबु, रामा या सर्वांनी देवदेवाच्या आर्थिक हिशोबावरुन दि. 18.12.2021 रोजी 17.00 वा. सु. राहत्या परिसरात नातेवाईक- दादासाहेब भिमा शिंदे यांसह त्यांची पत्नी- सुनिता व भाऊ- रघुनाथ यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दादासाहेब शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तेर गावचे सरपंच- नवनाथ मधुकर नाईकवाडी व ग्रामपंचायत सदस्य हे दि. 18.12.2021 रोजी 11.00 वा. सु. गावातील जुन्या अंगणवाडीमध्ये अभ्यासिका चालू करण्यासाठी फर्निचर लावत होते. यावेळी ग्रामस्थ- अविनाश इंगळे, स्वप्निल इंगळे, सौरभ इंगळे, सिध्देश्वर व वैभव वैरागकर यांनी तेथे जाउन, “तुम्हाला येथे विकास कामे करु देनार नाहित.” असे धमकावून त्या फर्निचरची तोडफोड करुन आर्थिक नुकसान केले. तसेच अविनाश इंगळे यांनी बाटलीत आनलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. अशा मजकुराच्या सरपंच- नवनाथ नाईकवाडी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 504, 506 सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपन अधिनियम कलम- 3, 7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर याच प्रकरणी अविनाश भास्कर इंगळे, रा. तेर यांनी प्रथम खबर नोंदवली की त्यांनी दि. 18.12.2021 रोजी 11.00 वा. अभ्यासिकेसाठी फर्निचर ठेवत असलेल्या ठिकाणी देवदेवतांच्या मुर्ती ठेवल्या असुन आधी त्या मुर्त्यांसाठी सुरक्षित जागा द्या व नंतर अभ्यासिकेचे काम करा. असे ग्रामस्थ- नवनाथ नाईकवाडी, रविराज चौगुले, मंगेश पांगरकर, इरशाद मुलानी, विठ्ठल लामतुरे, व्यंकटेश नाईकवाडी यांना सांगीतले असता नमूद लोकांनी अविनाश इंगळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुरा अविनाश इंगळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web