उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी : धोत्री, ता. तुळजापूर येथील सविता अर्जुन कदम, राहीबाई मदम व आगतराव मिसाळ या तीघांच्या बंद घराचे कुलूप दि. 11- 12.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून सविता कदम यांच्या घरातील सुवर्ण दागिने व रोख रक्कम असा 30,000 ₹ माल तर राहीबाई कदम व मिसाळ यांच्या घरातील साड्या, रोख रक्कम व स्टील टाकी असा 6,500 ₹ चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सविता कदम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिरढोण : बोरगाव (बु.), ता. कळंब येथील भारत माणिक कांबळे यांच्या गावातील पाझर तलावातील त्यांची 3 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 09 -10.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या भारत कांबळे यांनी दि. 12 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : रामनगर, उस्मानाबाद येथील प्रकाश रामलिंग मोरे यांनी उस्मानाबाद शिवारातील ओढ्यावर लावलेला 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप व 40 मीटर केबल दि. 11- 12.01.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रकाश मोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : गांधीनगर, कळंब येथील सिकंदर अमीन मोमीन यांचे  टेम्पो क्रुझर वाहन क्र. एम.एच. 25 एएल 1588 हे दि. 10- 11.01.2021 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सिकंदर मोमीन यांनी दि. 12 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web