उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
Osmanabad police

परंडा  : आष्टा, ता. भुम येथील विक्रम गोवर्धन शेळके हे कुटूंबासह दि. 04.01.2022 रोजी 03.00 वा. सु. आपल्या घरात झोलेले होते. दरम्यान त्यांच्या घराचा कडी- कोयंडा तीन अनोळखी पुरुषांनी तोडून घरात प्रवेश करुन विक्रम शेळके यांसह त्यांच्या पत्नीस कोयत्याने मारहान करुन जखमी केले व 26 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे पैजण व 1,600 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विक्रम शेळके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : खंडेश्वरी (मस्सा), ता. कळंब येथील बीएसएनएल भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या एकुण 87 मीटर लांबीच्या तीन केबल दि. 31.12.2021 ते 01.01.2022 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या बीएसएनएल तंत्रज्ञ- भागवत जाधव यांनी दि. 04 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : केज, जि. बीड येथील बाळासाहेब जाधवर यांनी दि. 05.12.2021 रोजी 02.00 वा. हासेगाव, ता. कळंब येथे जाउन तेथे दोन ट्रेलरसह ट्रॅक्टर क्र. एम.एच. 44 झेड 458 च्या चालक- अमोल अडागळे, रा. वडवणी, जि. बीड यास “तुझ्या मालकामार्फत मी ज्या मुकादमाशी व्यवहार केला होता. त्याने माझे काम केले नाही म्हणुन मी या ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रेलर घेउन जात आहे. असे तुझ्या मालकाला सांग.” असे सांगून ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रेलर घेउन गेले. अशा मजकुराच्या अमोल अडागळे यांनी दि. 04 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर  : तुळजापूरातील साठे चौकात असणाऱ्या एका पत्रा शेडमधील हॉटेलचे कुलूप दि. 03- 04.01.2022 दरम्यानच्या रात्री गावातीलच संशयीत तीन युवकांनी तोडून आतील दोन एलपीजी टाक्यासह शेगडी, भांडी व 6,500 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या उषा लोंढे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


केमवाडी येथे मारहाण 

तामलवाडी : केमवाडी, ता. तुळजापूर येथील मनोज व ज्ञानेश्वर तात्याराव काशीद या दोघा बंधुनी शेतातील रहदारीच्या कारणावरुन दि. 04.01.2022 रोजी 11.30 वा. सु. केमवाडी शिवारात नातेवाईक- आशा काशीद यांना लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या आशा यांल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web