उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील मुकूंद काशिनाथ कुलकर्णी यांच्या आळणी येथील शेतातील खोलीचा कडी- कोयंडा दि. 27- 28.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने तोडून खोलीतील 28 पोती सोयाबीन चोरुन नेले. अशा मजकुराच्या मुकूंद कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत येरमाळा येथील आबासाहेब रुमणे यांच्या चोराखळी येथील गट क्र. 622 मधील 1 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिक ग्रामस्थ- शिवाजी शिंदे यांनी मुलगा- गणेश व निखील यांच्या सहकार्याने हारवेस्टर यंत्राने कापून चोरुन नेले. अशा मजकुराच्या आबासाहेब रुमणे यांनी दि. 28.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : जेवळी (उ.), ला. लोहारा येथील पुतळाबाई होनाजे या दि. 19.10.2021 रोजी 11.30 वा. सु. जळकोट ते नळदुर्ग असा प्रवास ऑटोरिक्षा- एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासा दरम्यान त्यांच्या पर्समधील 105 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 40,000 ₹ रोख रक्कम गर्दीचा फायदा घेउन ऑटोरिक्षा- बसमधील प्रवाशांपैकी कोणीतरी चोरली. अशा मजकुराच्या पुतळाबाई होनाजे यांनी दि. 28 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : तालीम गल्ली, उस्मानाबाद येथील आसेफ शेख यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेली त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 2361 ही दि. 20- 21.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आसेफ शेख यांनी दि. 28.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला.


 

From around the web