धाराशिव जिल्ह्यत हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : आरोपी नामे- राम रंगा तेलंग रा. येवती, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद अन्य 4 यांनी  जावळाच्या कार्यक्रमास न बोलवण्याचे कारणावरून दि.15.07.2023 रोजी 21.45 वा. सु.  येवती शिवार ता.तुळजापूर येथे फिर्यादी नामे- शिवाजी परमेश्वर तेलंग, वय 35, रा. येवती ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनासंगणमत करुन शिवाजी तेलंग हे शेतातुन घरी येत असताना राम तेलंग यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहान केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवाजी तेलंग यांचे पॅन्टचे खिशातील 7,000 ₹काडून घेतले. अशा मजकुराच्या शिवाजी तेलंग यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 327,  504, 506, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग  : फिर्यादी नामे- राम रंगा तेलंग रा. येवती, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना  जागेच्या वादाच्या कारणावरून दि.15.07.2023 रोजी 21.00 वा. सु. येवती येथील जारच्या प्लॅन्ट जवळ ता.तुळजापूर येथे आरोपी  नामे- दत्तात्रय निवृत्ती कांबळे,2) लक्ष्मण निव.त्ती कांबळे,3) राम लक्ष्मण कांबळे, 4) सुभाष धानाजी तेलंग,5)शिवाजी परमेश्वर तेलंग, वय 35, सर्व  रा. येवती ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी संगणमत करुन राम तेलंग यांना तुला जागा देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडानेलोखंडी रॉडने मारहान करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राम तेलंग यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323,  504, 506, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- नितीन कालीदास व्हटकर, वय 38 वर्षे रा. लिंबोनी बाग तांबरी विभाग उस्मानाबाद यांना शेती घेयची लायकी आहे का असे म्हणुन दि.16.07.2023 रोजी 12.30 ते 13.00 वा. सु नितीन व्हटकर यांचे शेतात उपळा शिवार येथे आरोपी नामे- 1)सुरज शिवाजी पडवळ, 2)सालगडी प्रताप पडवळ अन्य 8 ते 10 या सर्वांनी गैरकायद्याची मंडळी जमवून नितीन व्हटकर यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने,प्लॉस्टिकच्या पाईपने मारहान करुन जखमी केले. तु पोलीसात केस केली तर जिवे मारुन आकू अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन व्हटकर यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323,  504, 506,  143, 147, 148 सह अ.जा.अ.ज.प्र. का.कलम3(1)(आर),3(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
बेंबळी  : फिर्यादी नामे- दिलीप सावकाऱ्या भोसले, वय 60 वर्षे रा. पाटोदा गायरान वस्ती, ता.जि. उस्मानाबाद यांना मागून आणलेली ज्वारी देण्याचे कारणावरुन दि.16.07.2023 रोजी 16.00 वा. सु दिलीप भोसले  यांचे घरासमोर आरोपी नामे- 1)अजय दिलीप भोसले, 2) विजय दिलीप भोसले, 3) पल्लवी विजय भोसले,4) काजला आजय भोसले, 5) दैवशाला दिलीप भोसले, सर्व रा. पाटोदा गायरान वस्ती, ता. जि. उस्मानाबाद या सर्वांनी मागून आणलेल्या ज्वारीचा हिस्सा का देत नाहीस असे म्हणून आरोपी नामे अजय भोसले यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने डोक्यात मारहान करुन जखमी केले. आरोपी  विजय भोसले यांनी दगडाने डाव्या पायाच्या घोट्यावर मारहाण केली. आरोपी नामे पल्लवी भोसले, काजला भोसले, दैवशाला भोसले यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिलीप भोसले यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323,  504, 506,  143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : आरोपी नामे- योगेंद्र भिमसेन गिरसे, धंदा- अधीक्षक संत गाडगेबाबा आश्रम शाळा मंगरुळ यांनी  दि.13.05.2023 रोजी 17.30 वा. सु. संत गाडगेबाबा आश्रम शाळा मंगरुळ येथील- विद्यार्थी नामे ऋषी अमोल शिंदे, वय 7 वर्षे व संदीप शिवाजी कांबळे या दोघांना क्श्रुरपणे वागणूक देवून त्यांना प्लास्टीकच्या पाईपने, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ईश्वर मल्हारी क्षिरसागर, वय 52 वर्षे, धंदा नोकरी, रा.धारीवाल टाउनशिप तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324 सह बालकाची काळजी व संरक्षण कायदा कलम  75, 82(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web