धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

वाशी, भूम, कळंब, नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद 

 
 
crime

वाशी : आरोपी नामे-1)रामदास बापु पवार, 2)रामा बापू पावर, 3) लक्ष्मण बापु पवार, 4) संजय बापु पवार, 5) दामु  उर्फ दादा रामदास पवार, 6) प्रशांत रामदास पवार, 7) कॅलास रामा पवार,8) प्रभाकर रामा पवार, 9) नारायण उर्फ पिंटु चंदर शिंदे, 10) विकास रामा शिंदे, सर्व रा. वाशी, 11) बलु भागवत शिंदे, रा. खैराट पारधीपीढी वाशी, 12) तानाजी शहाजी काळे, रा. पार्डी 13) नाना पांडुरंग काळे रा. जवळका ता. वाशी जि. धाराशिव या सर्वांनी दि. 13.09.2023 रोजी 09.30 वा. सु. झिन्नर पारधी पीडी येथे फिर्यादी नामे- प्रकाश उजण्या चव्हाण, वय 52 वर्षे, रा. दसमेगाव ह.मु. झिन्नर पारधी पीडी ता. वाशी  जि. धाराशिव यांना मोक्याचे केसमध्ये अडकवलेच्या कारणावरुन नुमद आरोपीतांनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ मधुकर उजण्या चव्हाण, व भावजयी ताराबाई उजण्या चव्हाण यांना पकडून झिन्नर येथुन वाशी येथे आणुन तुम्ही आम्हाला मोक्याचे केसमध्ये का अडकवले असे म्हणुन गॅसच्या पाईपने, मशीनच्या बेल्टने व केबलने डोक्यात पाटीवर छातीवर मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रकाश उजण्या चव्हाण यांनी दि.20.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 365, 385, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 भूम  : आरोपी नामे-1)संदीप पाटील, 2)पांडुरंग पाटील, 3) मुरली पाटील सर्व रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव यांनी मागील भांडणाचे कारणावरुन दि. 15.09.2023 रोजी 18.00 वा. सु. ओम ट्रेडर्स नावाचे दुकानासमोर वालवड येथे फिर्यादी नामे- ओंकार विठ्ठल हुंबे, वय 23 वर्षे, रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे भाउ ज्ञानेश्वर हुंबे हे ओंकार यांचे बचावास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन हासुडने पाठीत मारहान केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी ओंकार हुंबे यांनी दि.20.09.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन भुम  पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब  : आरोपी नामे-1)बाबासाहेब उत्तम साळवे, 2)उत्तम साळवे, 3)मंदाकिनी उत्तम साळवे, 4) आश्विनी अमोल सावंत सर्व रा. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 20.09.2023 रोजी 19.30 वा. सु. आरोपीच्या घरासमोर हासेगाव येथे फिर्यादी नामे- जयश्री सोमनाथ आरकडे, वय 45 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना त्यांची मुलगी  शिला बाबासाहेब साळवे हिने तिच्या घरी भांडण चालु आहे असे फिर्यादीस फानेवरुन सांगितल्याने फिर्यादी हे आरोपीच्या घरी गेले असता  नमुद आरोपीतांनी फिर्यादीस व फिर्यादीचे मुलीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. व फिर्यादीचे डोक्यात लोख्ंडी सळईने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी जयश्री आरकडे यांनी दि.20.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब  पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे-1)शहाजी शिवाजी मुळे, 2)प्रशांत सुधाकर चव्हाण, दोघे रा. नळदुर्ग, 3) बाळु उर्फ एकनाथ मोतीराम किल्लेदार रा. मुर्टा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी शेत वाटणीच्या कारणावरुन दि. 18.09.2023 रोजी 18.00 ते 18.15 वा. सु. मुर्टा येथे फिर्यादी नामे- कुमार भानुदार मोरे, वय 54 वर्षे, रा. मुर्टा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना बाळु किल्लेदार यांचे शेतीचे वाटनीत त्यांचे सारखे व त्यांचे बाजूने का बोलत नाही म्हणून फिर्यादीस व फिर्यादीचे मुलास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी कुमार मोरे यांनी दि.20.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

           

From around the web