धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

 वाशी : फिर्यादी नामे- गणेश रामलिंग कोळेकर, वय 26 वर्षे, रा. घाटनांदुर, ता. भुम जि. उस्मानाबाद यांचे राहत्या घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.04.09.2023 रोजी 11.00 ते 15.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,75,000 ₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी गणेश कोळेकर यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 380, 454 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : फिर्यादी नामे- भरत शामराव तिकटे, वय 63 वर्षे, रा. पाथरुड, ता. भुम जि. उस्मानाबाद यांचे राहत्या घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.04.09.2023 रोजी 13.30 ते 16.30 वा. सु. तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील 95 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने एकुण 1,54,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी भरत तिकटे यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 380, 454 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : दि.28.08.2023 रोजी 10.00 वा. पुर्वी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथील अंतररुग्ण विभागातील लिप्टमधील दोन ईलेक्ट्रीक मोटार किंमत अंदाजे 20,000₹ व आठ ड्राय बॅटऱ्या किंमत अंदाजे 3,200 ₹ असे एकुण 23,200₹ चा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी रामराव पागोजी जंगले, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी विज तंत्री रा. मेडीकल कॉलेज परिसर उस्मानाबाद  यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : फिर्यादी नामे- गिरीश प्रभाकर बिराजदार, वय 33 वर्षे, रा. केसरजवळगा ता. उमरगा, जि. उस्मानाबाद यांचे केसरजवळगा शिवारतील नदीमधील टेक्स्मो कंपनीची 7.5 एचपीची पानबुडी मोटार किंमत अंदाजे 19,000 ₹ ही दि.01.09.2023 रोजी 19.00 ते दि.02.09.2023 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी गिरीश बिराजदार यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

           

From around the web