धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  :आरोपी नामे- रवि लक्ष्मण पवार, रा. तेर ता. जि. उस्मानाबाद  यांनी दि.20.08.2023 रोजी 22.00 वा. सु. भंडारवाडी शेतशिवार मधील विहरीवरील सिल्व्हर कंपनीची पाच एचपी ची पानबुडी मोटार अंदाजे 24,500 ₹ किंमतीची पानबुडी ही मोटर नमुद आरोपी मोटरसायकलवर चोरुन घेवून जात असताना फियादी नामे- संजय श्रीहरी पाटील, वय 53 वर्षे रा. भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद  यांनी पाठलाग करुन आरोपीस पकडले. अशा मजकुराच्या  संजय पाटील यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- अभिजीत प्रेमानंद यांगड, वय 35 वर्षे रा. नंदनवन कॉलनी, प्लॉट नं 163 संभाजी नगर हा. मु. आदर्शनगर निरज गॅस एजन्सी जवळ तांबरी विभाग उस्मानाबाद यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 24 एन 7550 ही दि. 30.07.2023 रोजी 14.15 ते 16.30 वा. सु. कृष्णादेव विठ्ठल सावंत यांच्या घरी तांबरी विभाग उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अभिजीत यांगड यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  :फिर्यादी नामे-अशोक देविदास गोडगे, वय 45 वर्षे रा. गंभीरवाडी, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांचे गंभीरवाडी शिवारातील पारा रौडवर असलेल्या शेतातील गोठ्यासमोर बांधलेली गाय तांबड्या रंगाची अंदाजे 40,000₹ किंमतीची ही दि.20.08.2023 रोजी 23.00 ते दि 21.08.2023 रोजी 03.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक गोडगे यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम :फिर्यादी नामे-बालाजी बाबुराव कल्याणकर, वय 50 वर्षे रा. कलदेवनिंबाळा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांचे दि. 18.08.2023 रोजी 20.00 ते 24.00व. सु. कलदेव निंबाळा शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेला बैलाची अज्ञात व्यक्तीने दोरी कापून चोरुन घेवून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु सदर बैल जोडी आनेळखी इसमाच्या अंगावर मारण्यास धावत असल्याने सदर बैल चोरीचा प्रयत्न विफल झाला आहे. अशा मजकुराच्या बालाजी कल्याणकर यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379,511 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web