धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

 कळंब  : फिर्यादी नामे- चंद्रकांत महादेव घाडगे, वय 45 वर्षे, रा. मस्सा खं ता. कळंब जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 10.08.2023 रोजी रात्री 01.00 ते 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन धान्याच्या लोखंडी कोठ्यामध्ये ठेवलेले 25 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे, रोख रक्कम 35,000₹ असा एकुण 85,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या चंद्रकांत घाडगे यांनी दि.11.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा  : फिर्यादी नामे-अरविंद जयराम चव्हाण, वय 21 वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. चिंतामणी वडवानी राज्य मध्यप्रदेश हे ट्रक क्र एमएच 18 बी जी 2499 ने बागलकेोट ते अकोला असे ट्रक मणून तुर घेवून जात असताना दि10.08.2023 रोजी 05.00 वा. सु. चालत्या ट्रक मधील पाठीलमागील बाजूची ताडपत्री फाडून ट्रक मधील अंदाजे 45,000₹ किंमतीचे 10 तुरीचे कट्टे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अरविंद चव्हाण यांनी दि.11.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : फिर्यादी नामे- प्रज्वल परमेश्वर मस्के, वय 22 वर्षे, रा.गोविंदपुर ता. कळंब जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्र एम एच 25 एक्यु 5199 ही दि. 10.08.2023 रोजी 22.00 वा चे दरम्यान साठे चौक गोविंदपूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्याद प्रज्वल मस्के यांनी दि.11.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा  : फिर्यादी नामे- प्रकाश विश्वनाथ आष्टे, वय 55 वर्षे, रा. कुनाळी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांचे दि. 10.08.2023 रोजी 18.00 ते दि.11.08.2023 रोजी 07.00 वा. सु.  बेडगाव शिवारातील शेतातील शेड बांधणे करीता ठेवलेले अंदाजे 2,13,000 ₹ किंमतीचे साहित्य ज्यामध्ये लोखंडी  पाईप 12 नग,पन्हाळी लोंखडी पाईप 60 नग, बोअरवेलची 7.5 एच.पी. इलेट्रीक मोटर, लोखंडी आय पाईप 45 नग,500 लांबीचा केबल, स्टार्टर बॉक्स, असे आरोपी नामे- 1) राजेंद्र दिगंबर माने, 2) विलास माधव माने, 3) भ्रत दिगंबर माने, 4) श्रीनिवास भ्रत माने सर्व रा. बेडगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद चोरुन नेली. तसेच नमुद आरोपी यांना सालगडी विचारण्यास गेले असता त्यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्याद प्रकाश आष्टे यांनी दि.11.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379,504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                

From around the web