उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  : घोगरेवाडी, ता. उस्मानाबाद येथील- रामदत्त दिगंबर भारती यांचे दि. 04.02.2023 रोजी 10.00 ते 11.00 वा. सु. घोगरेवाडी शिवारातील शेत गट 37 मधील अंदाजे 30,000 ₹ किंमतीचा स्पिंकलर  शेट अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या रामदत्त भारती यांनी दि.05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : सांजा चौक काकानगर, उस्मानाबाद येथील- विजय भागवतराव तुपे  यांच्या दि.29.01.2023 रोजी 16.00 ते दि.30.01.2023 रोजी 16.00 वा. सु. रिगंरोड मेडसिगां येथे सर्वे नं 262/06 1.20 आर मध्ये अंदाजे 18,500 ₹ किंमतीचे स्पिंकलरचे नोजल 8, पाईप 14 असे साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विजय तुपे यांनी दि.05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरूम  : आनंदनगर मुरूम येथील- दिलीप पिराजी धडके यांनी  दि.03.02.2023 रोजी 07.30 वा. सु. आनंदनगर येथे रोडलगत उभे केलेल्या नागोबा गल्ली, मुरुम येथील- भालचंद्र तडकले यांच्या पिकअप मधील अंदाजे 2000 ₹ किंमतीचे 10 कि.वजनाची शेंगदाणा बियाणाची एक बॅग चोरुन नेली. अशा मजकुराच्या भालचंद्र तडकले यांनी दि.05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  :भिमनगर, उस्मानाबाद येथील- पल्लवी केराप्पा सुर्यवंशी ह्या दि.05.02.2023  रोजी 17.00 ते 17.30 वा. सु.आठवडी बाजार उस्मानाबाद येथे भाजीपाला घेत असताना अज्ञात व्यक्तीने पल्लवी यांच्या नकळत पर्समधील अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा मोबाईल फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या पल्लवी सुर्यवंशी यांनी दि.05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web