उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

कळंब  : हावरगाव, ता. कळंब येथील- बाबु मधुकर कोल्हे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची पॅशन प्रो मोटारसायकल क्र.एम.एच.25 एसी 9245 ही दि.19.02.2023 रोजी 16.00 ते 18.00 वा. दरम्यान कळंब येथील जुने बसस्थानका समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबु कोल्हे यांनी दि. 20.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : रामनगर, उमरगा येथील- शेषराव संभाजी कांबळे यांच्या बंद पडलेल्या जलस्वराज योजणेचे शिल्लक राहिलेले सामान  हे भिमनगर तुरोरी आष्टारोडलगत ठेवलेल्या बंद रुमची खिडकी अज्ञात व्यक्तीने दि. 08.02.2023 रोजी 23.30 ते दि. 09.02.2023 रोजी 01.00 वा. दरम्यान उघडून रुममध्ये प्रवेश करुन आतील  अं. 50,000 ₹ किंमतीचे  10 लोखंडी  बॉल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शेषराव कांबळे यांनी दि. 20.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : जिजाउ चौक, बार्शी नाका येथील- स्वप्नील सुभाष फडकुले यांनी त्यांचे नविन बंदकामाकरीता पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेले साहित्य पत्रा शेडचा दरवाजाची कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 18.02.2023 रोजी 19.00 ते दि 19.02.2023 रोजी 09.00 वा. दरम्यान तोडून शेडमध्ये प्रवेश करुन आतील अंदाजे 26,120 ₹ किंमतीचे बांदकाम साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या स्वप्नील फडकुले यांनी दि. 20.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आनंदनगर, मुरुम येथील- बिस्मिला शरीफ जेवळे यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी तब्बु जावेद मदारसे यांनी दि. 16.02.2023 रोजी 11.00 वा. दरम्यान उघडून घरात प्रवेश करुन आतील पेटीतील सुवर्ण- चांदीचे दागिने व 55,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 62,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बिस्मिला शरीफ जेवळे  यांनी दि. 20.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web