धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

वाशी  : फक्राबाद, ता. वाशी येथील- आण्णासाहेब लिंबाजी राख वय 49 वर्षे, यांचे पिंपळगाव क. शिवारात नॅशनल हायवे लगत हॉटेलमध्ये दि.11.06.2023 रोजी 02.30 वा. सु. आत्माराम वाघमोडे, रा. यशवंडी, अनिकेत हारे,  रा. पारगाव, शिवाजी कांबळे, रा. बावी, सागर थोरात, गोकुळ धाकटे,  दोघे रा. पुणे, अन्य 2  यांनी आण्णासाहेब यांच्या हॉटेलमध्ये घुसून शिवीगाळ व मारहान करुन काउंटर मधील रोख रक्कम  6,000 ₹ माल लुटून नेउन दरोडा टाकला. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आण्णासाहेब लिंबाजी राख यांनी दि.12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 427, 504, 506अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :  काटगाव, ता. तुळजापूर येथील- सिध्देश्वर शंकर कस्तुरे, वय 65 वर्षे, यांचे काटगाव शेत शिवार गट नं 392 मधील विहरीतुन अंदाजे 25,600₹ किंमतीचा विद्युत पंप हा दि.09.06.2023 रोजी 20.00 ते 10.06.2023 रोती 07.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सिध्देश्वर कस्तुरे यांनी दि.12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : हराळी, ता. लोहारा येथील- महेश रमेश राजे, वय 36 वर्षे, यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची फॅशन प्लस मोटरसायकल क्र एमएच 12 इपी 2188 ही दि. 04.06.2023 रोजी दुपारी 03.00  वा. सु. रामकृष्ण हॉटेल उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश राजे यांनी दि. 12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद येथील- संतोष चंद्रकांत सोलंकर, वय 43 वर्षे, यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए एफ 6055 ही दि. 09.06.2023 रोजी 13.30 ते 14.30  वा. सु. बायपास रोड वरुडा दादा उंबरे यांच्या शेतालगत येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष सोलंकर यांनी दि. 12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web