धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल
परंडा : देवळाली, ता. भुम येथील- सुरेखा विकास आरगडे, वय 55 वर्षे, ह्या दि.09.06.2023 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. आरगडे वस्ती बार्शी रोड देवळाली ता. भुम येळे शेत गट नं 440 येथे घरासमोर असताना अनोळखी चार व्यक्तीने विकास आरगडे, शहाजी आरगडे यांना चाकुने व काठीने मारहाण करुन सुरेखा यांचे गळ्यातील 4 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व भगत यांचे इजारीच्या खिशातील रोख रक्कम 1,700 ₹ किंमतीचा माल लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या सुरेखा आरगडे यांनी दि. 09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 394,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : मुंढे गल्ली, उस्मानाबाद येथील- संजय विनायक मुंडे यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची स्प्लेंडर मोटरसायकल क्र एम एच 25 डब्ल्यु 2930 ही दि. 07.06.2023 रोजी रात्री 09.00 ते 15.00 वा. सु. मुंडे यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय मुंढे यांनी दि. 09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : गंधोरा, ता. तुळजापूर येथील- प्रविण पदमाकर पाटील यांचे गंधोरा शिवारातील शेत गट नं 311 मधील अंदाजे 25,000 ₹ किंमतीचा विद्युत पंप हा दि.03.06.2023 रोजी 23.00 ते दि.04.06.2023 रोजी 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रविण पाटील यांनी दि. 09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :कसबे तडवळे, ता. उस्मानाबाद येथील- नितीन अगंद पवार यांची आत्या हिराबाई नलावडे ह्या दि.19.05.2023 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. लातुर ते नालासोपारा बसमध्ये असताना येडशी ते ढेंबरेवाडी प्रवासादरम्यान हिराबाई यांचे बॅग मधील व आशा निंबाळकर यांचे पर्स मधील सुवर्ण दागिणे व रोख रक्कम असा एकुण 1,28,720 ₹ किंमतीचा माल हा अनोळखी तिन महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेला. अशा मजकुराच्या नितीन पवार यांनी दि. 09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.