धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

येरमाळा  : पानगाव, ता. कळंब येथील- लाला प्रल्हाद ओव्हाळ हे व त्यांची पत्नी हे दोघे दि.05.06.2023 रोजी 21.00 ते दि.06.06.2023 रोजी 00.31 वा. सु पानगाव शिवारातील शेत गट नं40(अ) येथे शेतात असताना अनोळखी तीन व्यक्तीने जिवे ठार माण्याची धमकी दिली. लाला यांच्या पत्नीचे 3 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व एक रेडकु असा एकुण 12,500 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या लाला ओव्हाळ यांनी दि. 06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापुर  : मंगरुळ, ता. तुळजापूर येथील- अर्जुन बाळासाहेब खंडाळकर वय 23 वर्षे यांचे दि.25.04.2023 रोजी 10.00 ते 11.00 वा. सु. चैताली फोटो स्टुडीओ तुळजापुर येथील स्टुडीओ रुम मधील अंदाजे 30,000 ₹ किंमतीचा कॅमेरा अनोळखी एक पुरुष व एक महिला यांनी दरवाजा उघडून अर्जुन यांच्या फोटो स्टुडीओ मधील कॅमेरा चोरुन नेला. अशा मजकुराच्या अर्जुन खंडाळकर यांनी दि.06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : इनगोंदा, ता. परंडा येथील- श्रीकांत चंद्रकांत जगताप यांच्या इनगोंदा शिवारातील शेतातील 60 फुट केबल अंदाजे 2,200 ₹ किंमतीची ही दि.05.06.2023 रोजी 10.00 ते 06.06.2023 रोजी 07.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या श्रीकांत जगताप यांनी दि. 06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : सुलाखे हायस्कुलच्या पाठीमागे, बार्शी येथील- वसंत निवृत्ती लगदिवे  यांच्या शेकापुर शिवारातील शेतातील साठवण तलावमधील विद्युत पंप अंदाजे 14,000 ₹किंमतीचा हा दि.02.06.2023 रोजी 16.00 ते 03.06.2023 रोजी 08.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या वसंत लगदिवे यांनी दि.06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web