धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापुर  : धामणगांव ता.आष्टी जि.बीड येथील- संभाजी रामा झिंर्जुके यांचे अंदाजे 4,65,200 ₹ किंमतीचा एक इर्टीगा गाडी, रेडमी कंपनीचे दोन मोबाईल, रोख रककम असे हे दि.29.05.2023 रोजी 04.30 वा दरम्यान सोलापुर रोडवरील उडडाण पुलाजवळ तुळजापुर येथुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या संभाजी रामा झिंर्जुके यांनी दि. 29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : मध्यवर्ती सहकारी बँक शाखा खामसवाडी ता.कळंब येथील- सतिश ज्ञानोबा काळे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, खामसवाडी ता.कळंब येथुन रोख रक्कम अंदाजे 80,000 ₹ ही दि.27.05.2023 रोजी 13.30 वा ते दि. 29.05.2023 रोजी 07.30 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सतिश ज्ञानोबा काळे यांनी दि. 29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : आरळी बु ता.तुळजापुर येथील- जनार्धन भाउराव व्हरकट यांची हॉटेल मेघमल्हार समोर उस्मानाबाद येथे लावलेली मोटार सायकल हिरो होन्डा स्पेल्डंर कंपनीची एम एच 13 एके 7499 अंदाजे 15,000 ₹ ही दि.18.05.2023 रोजी 11.30 वा ते 16.00 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या जनार्धन भाउराव व्हरकट यांनी दि. 29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : चिखली ता.उस्मानाबाद येथील- महादेव प्रल्हाद जाधव यांची चिखली शिवारातील शेत गट नं 184 मध्ये असलेल्या ज्वारी व हरभरा पिकास पाणी देण्यासाठी महिंद्रा कंपनीचे काळ्या रंगाचे 27 पाईप व चिमन्या किंमत अंदाजे 47,100 ₹ ही दि.18.05.2023 रोजी 18.00 वा ते दि.18.02.2023 रोजी 09.00 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव प्रल्हाद जाधव यांनी दि. 29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web