धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापुर : काक्रंबा ता. तुळजापुर येथील- प्रसाद कमलाकर चौगुले यांचे काक्रंबा येथील घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन कपाटील रोख रक्कम 1,20,000/- रु व सहा तोळयाचे नेकलेस, पाच तोळयाचे नेकलेस, एक तिन तोळयाची सोनसाखळी, दोन तोळयाची अंगठी, एक तोळयाची अंगठी मोतीचुर असे एकुण 5,45,000/- रु चा अज्ञात व्यक्तीने दि. 18.05.2023 रोजी 11.15 ते 15.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रसाद कमलाकर चौगुले यांनी दि. 19.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : गोर्वधनवाडी ता.जि.उस्मानाबाद येथील- रामेश्वर केशव सुरवसे यांची मोसा बुलेट कंपनीची एम एच 25 ए.जी.4997 अंदाजे 75,000₹ किंमतीचे वनपाल गायकवाड यांचे घराचे समोरुन भिमनगर, कळंब येथुन दि.14.05.2023 रोजी 22.00 ते दि.15.05.2023 रोजी 07.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या रामेश्वर सुरवसे यांनी दि. 19.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : सावरगांव ता.तुळजापुर येथील- विवेकानंद मारुती डोके यांची मोटार सायकल स्प्लेंडर प्लस कंपनीची एम एच 25 ए.एक्स.7935 अंदाजे 30,000₹ किंमतीचे मौजे सावरगाव येथील शेत गट नंबर 1147 सावरगांव शिवार येथुन दि.18.05.2023 रोजी 06.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या विवेकानंद डोके यांनी दि. 19.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : खंडाळा ता.तुळजापुर येथील- महादेव पंडीत ढवण हे जिओ कंपनीत खाजगी नौकरीस आहेत. त्यांचे मौजे चिंचपुर ढगे ता. भुम येथील इंडस टावर नं 1255239 चे पावर केबल जिओ बीटीएस ते टावर ॲन्टीना पर्यंतचे पावर केबलचे 30 मिटरचे 10 नग असे एकुण 15,000/- रु चा माल दिनांक 05.04.2023 रोजी 00.40 ते 03.00 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या महादेव ढवण यांनी दि. 19.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

ढोकी : ब्रम्हाचीवाडी ता.जि.उस्मानाबाद येथील- 1.सतिश पांडुरंग माने 2. बंडु महाजन रा. ब्रम्हाचीवाउी ता.जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन दि.17.05.2023 रोजी 16.30 वा. दरम्यान तु माझे पैसे का देत नाहीस या कारणावरुन पप्पु नामदेव गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करुन उसने पाठीवर मारहाण करुन लाथबुक्याने छातीवर,पाठीवर मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पप्पु गायकवाड यांनी दि.19.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-324,323,504,506,34 सह 3(1)(R)(S) अ.जा.ज.अप्र.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                             

From around the web