धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे-1) शुभम संतोष्ज्ञ अंबुलगे, 2) लक्ष्मण सुरवसे, 3) नवते दत्ता अन्य 3 सर्व रा. उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि. 17.08.2023 रोजी 17.30 वा. सु. शितल हॉटेल समोर मुळजरोड कोळीवाडा उमरगा येथे फिर्यादी नामे- आपण्णा रघुराम आबाचणे, वय 45 वर्षे, रा. कोळीवाडा, मुळज रोड, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कत्ती, लाकडी काठीने व पाईपने डोक्यात, मानेवर, हातावर मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या आपण्णा आबाचणे यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, का.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

 भूम  : आरोपी नामे-1) हिना जलील पठाण, 2) जमीला सलीम पठाण, 3) रेश्मा सुलेमान पठाण,4) सिमा तौफीक पठाण, 5) राणु सुलेमान पठाण, 6)सलमान सलीम पठाण, 7)शाहीण सलमान पठाण, 8)तौफीक सलीम पठाण, 9)खलील हाफीसखन पठाण, 10)कलीम पठाण,11) राजु पठाण, 12) सुलेमान पठाण, 13) शाहरुख पठाण, 14) अमीर पठाण, 15) इक्बाल पठाण, 16) खलील पठाण, 17) ईस्माईल पठाण, 18) जमाल सुलेमान पठाण, सर्व रा. भोनगिरी ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.17.08.2023 रोजी 12.30 वा. सु. भोनगिरी येथे फिर्यादी नामे- रफीक जहांगीर शेख, वय 29 वर्षे, रा. भोनगिरी, ता. भुम जि. उस्मानाबाद व अमीर शेख, शफीक शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, गॅसच्या पाईपने मारहाण जखमी केले. तसेच मैमुना जहांगीर शेख या रफीक शेख्‍ यांचे बाचावास आल्या असता यांचे उजवे हातावर तलवारीने  मारन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रफीक शेख यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 323,143, 147, 148, 149, 504,506, सह कलम 4,25 भ. ह. का.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब  : आरोपी नामे-1) राहुल धनाजी पाटील रा. म्हाडा कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ बार्शी ता. बार्शी, जि. सोलापूर यांनी कौटुंबिक वादाचे कारणावरुन दि.04.08.2023 रोजी 10.30 वा. सु. येरमाळा ते मस्सा(खं) जाणारे शिवारातील करंजकर यांचे पेट्रोल पंपाचे पुढे मस्सा खं शिवार येथे फिर्यादी नामे सुप्रिया राहुल पाटील, वय 28 वर्षे रा. म्हाडा कॉलनी सरकारी दवाखान्याजवळ बार्शी, ता बार्शी जि. सोलापूर यांना  तु रात्री  माझे आई वडीलां सोबत का भांडण केले असे म्हाणून शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन हात पिरगाळून फॅक्चर केला. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुप्रिया राहुल पाटील यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 325,323, 504,506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : आरोपी नामे-1)सिताराम गेनबा भाकरे,2) तुकाराम गेनबा भाकरे दोघे रा. तामलवाडी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी पत्रयाचे शेड मारण्याचे कारणावरुन दि.25.06.2023 रोजी 10.30 वा. सु. तामलवाडी शिवारात शेत गट नं 14 येथे फिर्यादी नामे- दशरथ शिवाजी भाकरे, वय 38 वर्षे, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांना  तुकाराम भाकरे यांनी ए लंगड्या ही जागा आमची आहे या जागेत शेड मारायचे नाही. असे शिवीगाळ  करुन लाथाबुक्याने, अपंग असलेल्या पायाचे घोट्या जवळ लाकडाने मारहण करुन जखमी केले.तसेख्‍ जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दशरथ भाकरे यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323, 504,506, 34 सह अपंग व्यक्तीचा अधि 2016 कलम 92 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web