उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : तुळजापूर तालुक्यातील व्होर्टी ग्रामस्थ- गणेश दिलीप भोसले यांसह त्यांची आई- सुनिला हे दि. 23.01.2022 रोजी 15.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी शेतातून पाईप लाईन नेल्याच्या कारणावरुन नातेवाईक- गोविंद राम भोसले, रुक्मीणी भोसले, खंडू भोसले या तीघांनी गणेश यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केल्याने या मारहानीत सुनिता यांचे दोन दात पडून त्या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या गणेश भोसले यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : शास्त्रीनगर, उमरगा येथील मल्लीनाथ व लिंगाप्पा गुंडाप्पा माळी या दोघा भावांत शेतजमीनीच्या कारणारुन वाद असून दि. 25.01.2022 रोजी 10.00 वा. सु. राहत्या घरात या वादाचे पर्यावसान मारहानीत होउन लिंगाप्पा यांनी भाऊ- मल्लीनाथ यांना लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहान करुन डाव्या कानास चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या मल्लीनाथ माळी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण   : लोहटा (पुर्व), ता. कळंब येथील प्रकाश रावसाहेब सांजेकर व मीरा सांजेकर या दोघांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 21.01.2022 रोजी 18.00 वा. सु. हिंगणगाव शिवारात गावकरी- सुंदर सांजेकर व अनिता सांजेकर या दोघा पती- पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तसेच कोयत्याच्या मुठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिता सांजेकर यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : गोंधळवाडी, ता. तुळजापूर येथील रत्ना अनिल कोळेकर यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 24.01.2022 रोजी 04.30 वा. सु. भाऊ- धुळोबा गणपत सोलंकर यांना त्यांच्या घरात लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच रत्ना यांनी भाऊ- धुळोबा यांच्या शेडमध्ये विस्तव टाकल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जळून अंदाजे 60 हजाराचे नुकसान झाले. तसचे रत्ना यांनी जळालेल्या खोलीतील कपाटाची तोडफोड केली. अशा मजकुराच्या धुळोबा सोलंकर यांनी दि. 25 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 436, 427, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web